मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
You are here
ज्ञानेशच्या गझला
Posted by विश्वस्त on Wednesday, 13 May 2009
ह्या संकेतस्थळावर आगमन झाल्यापासून सफाईदार, सकस व आश्वासक गझललेखन करणाऱ्या ज्ञानेश ह्यांच्या काही निवडक गझला एकत्रितपणे उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होतो आहे. ज्ञानेश ह्यांना पुढील वाटचालीसाठी सुरेशभट.इनच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानेश,
मी स्वतःवर लावलेला नियम तुझ्यासाठी मोडत आहे. याचे कारण मैत्री ही मोठी व अमर असते.
ही बातमी मला तू एस .एम. एस. वर कळवलीस अन ताबडतोब जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन हा प्रतिसाद देत आहे.
मनःपुर्वक अभिनंदन!
मी या सर्व, व त्यातही, जुने विसरून गेलेले, या सर्वोत्कृष्ठ गझलेचा / गझलांचा पहिल्यापासूनच चाहता आहे. तुझा वावरही अत्यंत आनंददायी असतो.
या सर्व गझला एकत्र झाल्यावर आता फार बरे वाटते.
निश्चीतच, मला आधीपासूनच वाटायचे की एक उत्कृष्ट गझलकार तुझ्यात आहे.
ही पुस्तिका प्रकाशित होणे हे त्याचेच निदर्शक आहे.
चित्तरंजनने पुलस्तिंपाठोपाठ तुझ्या गझला एकत्र करून अत्यंत योग्य पारख तर केली आहेच, पण सशक्त प्रोत्साहनही दिले आहे.
जाहला बराच वेळ, गोष्टी, भेट चोरटी ( नंतरची ), तुझ्या-माझ्यात झालेले, खरवडुनी पाहतो शेंदूर थोडासा वाली या सर्व गझलांचा मी चाहता आहे.
'जुने विसरून गेलेले' ही तर माझ्यामते शुद्ध व बेहतरीन मोस्ट गझल असून अनेकांना 'गझल कशी करावी' हे दाखवून देणारी आहे. वेळोवेळी मी त्या गझलेतील शेर तुला मेसेजवर पाठवलेले आहेत, अगदी रात्री दीड दीड वाजताही, हे तुला आठवेलच!
त्यातील माझ्यामते सर्वोत्कृष्ट शेरः
'मला भेटायला आले, मला भेटून जाताना मला भेटायचे नाही, असे ठरवून गेलेले'
मनापासून अभिनंदन! एक एस्टॅब्लिश्ड गझलकार झाला आहेसच, आता, भरपूर नवीन गझला येवोत!
भूषण कटककर
भूषणजी, तुमच्या या अकृत्रीम स्नेहभावनेबद्दल शतशः आभार.
या साईटवर आलो त्यावेळी मी एक सामान्य कुवतीचा, थोडासा आगाऊ आणि बराचसा आत्ममग्न कवी होतो. इथे आल्यानंतर, वावरल्यानंतर, इथल्या गझला,प्रतिसाद, लेख, चर्चा इत्यादिंचे वाचन केल्यानंतर अनेक गोष्टी मला उलगडत गेल्या. गझलेबद्दलचे आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर होत गेले. या साईटने मला बरेच काही शिकवले. माझ्या चुकांना सांभाळून घेतले. शब्दात सांगता येणार नाही असे पुष्कळ काही दिले. इथल्या प्रत्येक गझलकाराकडून मी काही ना काही शिकलो आहे. एक गझलकार म्हणून माझ्या जडणघडणीत या वेबसाईटचा फार मोठा वाटा आहे, हे आज कृतज्ञपणे नमूद करतो.
माझ्या गझलांचा हा संग्रह म्हणजे माझ्यातल्या कवीला आजवर मिळालेले पहिले पारितोषिक आहे. याचा आनंद काही और आहे. या आधी प्रदीप कुलकर्णी अणि पुलस्ति यांसारख्या दिग्गजांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्यानंतर माझा संग्रह प्रकाशित करणे हा माझा फार मोठा सन्मान आहे असे मी समजतो. अर्थात, माझ्या पुढील वाटचालीसाठी दिलेले हे प्रोत्साहन आहे, याची मला नम्र जाणीव आहे.
पुन्हा एकदा चित्तरंजन यांचे, साईटवरील सर्व गझलकारांचे, टीकाकारांचे,मित्रांचे आणि रसिकांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या ऋणात राहण्यात मला आनंद आहे !
अभिनंदन ज्ञानेश!
तुझ्या गझलांची इतर अनेकांप्रमाणे मीही फार वाट पाहत असतो. प्रदीपजींप्रमाणेच सहजता, प्रासादिकता, गझलियत आणि एकूणच दर्जाचे तुझे सातत्यही वाखाणण्याजोगे आहे! भरपूर लिहीत राहा!!
या निवडीबद्दल विश्वस्तांचेही अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद!
अभिनंदन ज्ञानेश !
तुमच्या गझल नेहमीच लक्षवेधी वाटतात. तुमच्या रचनांनी नेहमीच गझल आस्वादण्याचा आनंद दिलेला आहे. हा तुमचा संग्रह प्रकाशित होणं हे अगदीच deserving आहे.
-सतीश
प्रतिसाद
भूषण कटककर
बुध, 13/05/2009 - 21:00
Permalink
ज्ञानेशसाठी
ज्ञानेश,
मी स्वतःवर लावलेला नियम तुझ्यासाठी मोडत आहे. याचे कारण मैत्री ही मोठी व अमर असते.
ही बातमी मला तू एस .एम. एस. वर कळवलीस अन ताबडतोब जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन हा प्रतिसाद देत आहे.
मनःपुर्वक अभिनंदन!
मी या सर्व, व त्यातही, जुने विसरून गेलेले, या सर्वोत्कृष्ठ गझलेचा / गझलांचा पहिल्यापासूनच चाहता आहे. तुझा वावरही अत्यंत आनंददायी असतो.
या सर्व गझला एकत्र झाल्यावर आता फार बरे वाटते.
निश्चीतच, मला आधीपासूनच वाटायचे की एक उत्कृष्ट गझलकार तुझ्यात आहे.
ही पुस्तिका प्रकाशित होणे हे त्याचेच निदर्शक आहे.
चित्तरंजनने पुलस्तिंपाठोपाठ तुझ्या गझला एकत्र करून अत्यंत योग्य पारख तर केली आहेच, पण सशक्त प्रोत्साहनही दिले आहे.
जाहला बराच वेळ, गोष्टी, भेट चोरटी ( नंतरची ), तुझ्या-माझ्यात झालेले, खरवडुनी पाहतो शेंदूर थोडासा वाली या सर्व गझलांचा मी चाहता आहे.
'जुने विसरून गेलेले' ही तर माझ्यामते शुद्ध व बेहतरीन मोस्ट गझल असून अनेकांना 'गझल कशी करावी' हे दाखवून देणारी आहे. वेळोवेळी मी त्या गझलेतील शेर तुला मेसेजवर पाठवलेले आहेत, अगदी रात्री दीड दीड वाजताही, हे तुला आठवेलच!
त्यातील माझ्यामते सर्वोत्कृष्ट शेरः
'मला भेटायला आले, मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही, असे ठरवून गेलेले'
मनापासून अभिनंदन! एक एस्टॅब्लिश्ड गझलकार झाला आहेसच, आता, भरपूर नवीन गझला येवोत!
भूषण कटककर
ज्ञानेश.
बुध, 13/05/2009 - 22:48
Permalink
मनःपूर्वक आभार...!
भूषणजी, तुमच्या या अकृत्रीम स्नेहभावनेबद्दल शतशः आभार.
या साईटवर आलो त्यावेळी मी एक सामान्य कुवतीचा, थोडासा आगाऊ आणि बराचसा आत्ममग्न कवी होतो. इथे आल्यानंतर, वावरल्यानंतर, इथल्या गझला,प्रतिसाद, लेख, चर्चा इत्यादिंचे वाचन केल्यानंतर अनेक गोष्टी मला उलगडत गेल्या. गझलेबद्दलचे आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर होत गेले. या साईटने मला बरेच काही शिकवले. माझ्या चुकांना सांभाळून घेतले. शब्दात सांगता येणार नाही असे पुष्कळ काही दिले. इथल्या प्रत्येक गझलकाराकडून मी काही ना काही शिकलो आहे. एक गझलकार म्हणून माझ्या जडणघडणीत या वेबसाईटचा फार मोठा वाटा आहे, हे आज कृतज्ञपणे नमूद करतो.
माझ्या गझलांचा हा संग्रह म्हणजे माझ्यातल्या कवीला आजवर मिळालेले पहिले पारितोषिक आहे. याचा आनंद काही और आहे. या आधी प्रदीप कुलकर्णी अणि पुलस्ति यांसारख्या दिग्गजांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्यानंतर माझा संग्रह प्रकाशित करणे हा माझा फार मोठा सन्मान आहे असे मी समजतो. अर्थात, माझ्या पुढील वाटचालीसाठी दिलेले हे प्रोत्साहन आहे, याची मला नम्र जाणीव आहे.
पुन्हा एकदा चित्तरंजन यांचे, साईटवरील सर्व गझलकारांचे, टीकाकारांचे,मित्रांचे आणि रसिकांचे आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या ऋणात राहण्यात मला आनंद आहे !
तुमचाच-
ज्ञानेश.
ज्ञानेश.
बुध, 13/05/2009 - 22:50
Permalink
मनःपूर्वक आभार...!
पुलस्ति
गुरु, 14/05/2009 - 07:08
Permalink
अभिनंदन!
अभिनंदन ज्ञानेश!
तुझ्या गझलांची इतर अनेकांप्रमाणे मीही फार वाट पाहत असतो. प्रदीपजींप्रमाणेच सहजता, प्रासादिकता, गझलियत आणि एकूणच दर्जाचे तुझे सातत्यही वाखाणण्याजोगे आहे! भरपूर लिहीत राहा!!
या निवडीबद्दल विश्वस्तांचेही अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद!
चांदणी लाड.
शुक्र, 15/05/2009 - 12:40
Permalink
अभिनंदन..!!
ज्ञानेश अभिनंदन..!!
पुलस्ति यांच्याशी पुर्ण सहमत.
पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा..!
विश्वस्ताचेही मनापासुन आभार..!!
सतीश
शनि, 16/05/2009 - 11:59
Permalink
अभिनंदन !
अभिनंदन ज्ञानेश !
तुमच्या गझल नेहमीच लक्षवेधी वाटतात. तुमच्या रचनांनी नेहमीच गझल आस्वादण्याचा आनंद दिलेला आहे. हा तुमचा संग्रह प्रकाशित होणं हे अगदीच deserving आहे.
-सतीश
मिल्या
शनि, 16/05/2009 - 20:44
Permalink
अभिनंदन
वा वा ज्ञानेश अभिनंदन
तुझ्या पुढिल लिखाणास खूप खूप शुभेच्छा
सोनाली जोशी
मंगळ, 19/05/2009 - 16:42
Permalink
अभिनंदन
ज्ञानेश , तुमचे अभिनंदन . तुमच्या गझला नक्कीच काही तरी नविन वाचल्याचा आनंद देत आल्या आहेत. शुभेच्छा.
विश्वस्तांचे या सोयी बद्दल आभार.
सोनाली