कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
"लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते."हरफनमौला सुरेश
विश्वस्त | एप्रिल 15, 2010 - 11:57 am
गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.