जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !
भटांवरचे लेखन
'मग माझा जीव'ची आठवण
त्या काळात मी बांद्र्याला साहित्य सहवासमध्ये राहत होतो. दिनकर साक्रीकरांचा धाकटा आर्किटेक्ट मुलगा राजू खास दोस्त बनला होता. रात्री पायर्यांवर गप्पा मारत बसलो असताना मी सहज त्याला माझा कवितेचा चाललेला शोध सांगितला. काही क्षणात तो एकदम म्हणाला, "तू नेहमी दोनच ओळी गुणगुणत असतोस, त्या सुरेश भटांच्याच आहेत ना? मग माझा जीव... असे काहीतरी शब्द आहेत बघ." मी चमकून विचारलं, "मी आपला चाळा म्हणून ते गुणगुणत असतो. काव्यगायनासारखं. पण ती तुला चांगली चाल वाटते?" तो गोंधळून म्हणाला, "का? ती छानच चाल आहे की!" असा अगदी अकल्पितपणे माझा कवितेचा शोध संपला.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
- पुढे वाचा
दोन विडिओ
असेच एकदा इंटरनेटवर वर शोध घेता मला कविवर्य भटांचे पुढील दोन विडिओ सापडलेत. हे विडिओ या संकेतस्थळावर असावेत असे वाटले, म्हणून पाठवीत आहे. खालील दुव्यांवर टिचकी देऊन विडिओ पाहावेत.
आयुष्य तारण राहिले...
' सुरेश भट ' या दोन शब्दांत काय काय साठवलं होतं. ती भाववृत्ती , ती बेपर्वाई , ती तंद्री , ती मराठी गझलची खांद्यावर घेतलेली पताका , ते मराठी भाषेच्या अणूरेणूवरचं प्रेम , ती कवितेची तगमग , ती धुंदी , ते मैफली गाजवणं , ती बेहोषी , तो कैफ आणि एक बेछूटपणासुद्धा...
