कळता कळता...


चंद्र लाजला नभात कैसा पळता पळता
कळेल तुजला भेद सखे हा कळता कळता...


नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बांधे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता


'अंत' नव्हे हा, 'मोक्ष' साजणा तुझा असे रे,
शमा म्हणाली  परवान्याला जळता जळता...


पुन्हा भेटुया क्षितिजावरती  दोघे आपण,
सूर्य  बोलला असेच काही  ढळता ढळता...


तिचा जरासा स्पर्श लाभला सांत्वनवेळी
अश्रूंची मग फुलेच झाली,  गळता गळता....


गझल: 

प्रतिसाद

नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बान्धे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता
छान...

पुन्हा भेटूया क्षितीजावरती  दोघे आपण,
सुर्य  बोलला असेच काही  ढळता ढळता...
सुंदर...

तिचा जरासा स्पर्श लाभला सान्त्वनवेळी
अश्रून्ची मग फुलेच झाली,  गळता गळता....
वा...वा...
लिहीत राहा ज्ञानेश...गझला खूप छान लिहिशील तू. मात्र, शुद्धलेखनाकडे कटाक्षाने लक्ष दे...

वरील प्रतिसादांप्रमाणेच. सुरेख.

तुमच्यासारख्या दिग्गज लोकान्चे प्रतिसाद पाहुन आनन्द झाला.
मी अजुन थोडा प्रयत्न करेन. शुद्ध लिहिण्याचा प्रोब्लेम अहे खरा. तो अनुस्वार सापडत मला.

नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बान्धे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ: a aa/
A i ee
/I u uu/
oo/U e ai o au aM/
a.N a: ऍ ऑ अँ आँ E O EM/
E.n OM/
O.n




अधिक माहितीसाठी देवनागरीत असे लिहावे! हे पान वाचावे

बरा प्रयत्न!

अनुस्वार  सापडला.
@रसिक-  'बरे' म्हटल्याबद्दल  आभार. (निदान  'वाईट'  नसल्याचे  समाधान)

इथे काही चांगले बाण वायाही जातात. दुर्दैव! धनुर्धार्‍याचे! पर्जन्यास्त्र सुटेपर्यन्त कोणीतरी वायवास्त्र सोडलेले असते.

मला आता गझल करणे हे युद्ध असल्यप्रमाणे वाटायला लागले आहे.

पुन्हा भेटुया क्षितिजावरती  दोघे आपण,
सूर्य  बोलला असेच काही  ढळता ढळता...

चांगला शेर

नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बांधे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता
स्सही !!!
 

नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बांधे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता
स्सही !!!
 

चांगला शेर

नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बान्धे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता