भेटून जा...

-----------------------------


आसमानीच्या  परी , भेटून  जा
एकदा  केव्हातरी  भेटून  जा...


मी  समुद्रासारखा  नाही जरी,
तू  सरितेच्या  परी  भेटून  जा


सावल्यांचे  खूप  झाले  भास  गे,
मन्मनाच्या  अंतरी  भेटून  जा


मी  तुला  आव्हान  आहे  बांधले,
वादळा, माझ्या घरी  भेटून जा..


दु:ख  माझे माणकाच्या  सारखे,
वेदनाही  भर्जरी ,  भेटून  जा


श्वास  आता  धाप  टाकू  लागले,
साजणे,  आता  तरी  भेटून  जा...


-----------------------------

गझल: 

प्रतिसाद

अजून रंगवा. रंगवता येईल.[प्रतिसाद संपादित-विश्वस्त]

शेवटचा शेर बाण आहे. पण बर्‍याच जणांनी तो बाण तसाच वापरला आहे. सोडण्याची पद्धत किंवा टणत्काराचा आवाज वेगळा पाहिजे.

....तेलही गळे.
तुम्हालाही जमेल निश्चितच. मला आवडलेले विचार ...
दु:ख  माझे माणकाच्या  सारखे,
वेदनाही  भर्जरी ...
मी  समुद्रासारखा  नाही जरी,
तू  सरितेच्या  परी  भेटून  जा