पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही-- "माणूस कोणता मेला?"
तरही गझल
क्षण एक पुरे जगण्यास खरा
मयुरेश साने | ऑगस्ट 30, 2011 - 4:47 pmहसलास किती मज सांग जरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा
सुचतील मला तितक्या गझला
छळ ती ल मला जितक्या नजरा
जगणार किती मरणार किती
सुटली न कुणा बघ येरझ रा
फसवे असणे फसवे नसणे
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
- पुढे वाचा
''मागणे''
कैलास | ऑगस्ट 18, 2011 - 11:43 amगृहस्थाश्रमालाच वैरागतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी
भिती वाटते या जगाची कश्याने?
जिथे झोप घ्यावी,तिथे जागतो मी
कुणाचे कधी फार ऐकून घेतो
कधी वाटले तोफही डागतो मी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
- पुढे वाचा
सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही)
supriya.jadhav7 | जुलै 29, 2011 - 2:53 pmसरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही)
अंतरीचा घाव ताजा गंधण्याची कारणे,
काय होती वेदना आनंदण्याची कारणे ?
साजणाचे भास होते की सुखाचे चांदणे...
मध्यराती रोमरोमी धुंदण्याची कारणे
जन्मभर....
supriya.jadhav7 | जुलै 15, 2011 - 1:14 am*
खोल खोल आतवर तुझी नजर
गुंतले जिच्यात मी निमीषभर
आर्जवे खट्याळ पाहण्यातली
का करी अजाणता मनात घर ?
थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर
नेमकाच प्रश्न टाळलास तू
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
- पुढे वाचा
तुझी नजर
मिल्या | जुलै 13, 2011 - 12:29 pmमायबोलीवर कैलास गायकवाड ह्यांनी दिलेल्या
'खोल खोल आतवर तुझी नजर' ह्या मिसर्यावर रचलेली गझल
खोल खोल आतवर तुझी नजर
काळजास पाडते अजून घर
एवढा उगाच का चढेल ज्वर?
खोल खोल आतवर तुझी नजर
जखमा जुन्या (गझल )
मनिषा नाईक. | एप्रिल 7, 2011 - 10:50 pmजखमा जुन्या (गझल )
का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता
मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता
एकदा तरी
मिल्या | फेब्रुवारी 28, 2011 - 6:48 pmमायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेल्या मिसर्यावर लिहीलेली ही तरही गझल
लढेन षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
प्रीती सखे मलाही का परवडू नये...?
विशाल कुलकर्णी | फेब्रुवारी 21, 2011 - 5:39 pmहसण्यात काय मोठे, का रे रडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये...
जगण्यात अर्थ नाही मृत्यो तुझ्याविना,
सहवास मात्र माझा तुज आवडू नये...
आहे तुझाच वेडा, बदनाम जाहलो
