भटांच्या लेखणीतून

भटांच्या लेखणीतून

"एखाद्या प्रेषिताचा आव न आणता मी अगदी प्रेमपूर्वक नव्या कवींना सांगू इच्छितो की, प्रसिद्धी म्हणजे महानता नव्हे; सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते, ज्याच्या काव्यपंक्ती जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. तो कवी आपोआप, अगदी सहज महान बनतो. "
  पुढे वाचा...

"मी माझा कौल तरुण पिढीच्या बाजूने दिलेला आहे आणि म्हणून गझलेचे जे निर्भेळ सत्य आहे, ते आणि फक्त तेच कोणाचीही पर्वा न करता येथे सांगणे हे माझे कर्तव्य आहे... ... उगवत्या पिढीने गझलेला आपले म्हटले की, मला हे सार्थक मिळणार आहे."

" सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची नसते... ...जे 'करीयर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात. अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!"
'झंझावात' या गझलसंग्रहाची प्रस्तावना   पुढे वाचा...

कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून 'गझलेची बाराखडी' नावाची एक पुस्तिका लिहिली होती...