माझ्या कवितेचा प्रवास

"एखाद्या प्रेषिताचा आव न आणता मी अगदी प्रेमपूर्वक नव्या कवींना सांगू इच्छितो की, प्रसिद्धी म्हणजे महानता नव्हे; सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते, ज्याच्या काव्यपंक्ती जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. तो कवी आपोआप, अगदी सहज महान बनतो. "

कविवर्य सुरेश भट ह्यांचा 'माझ्या कवितेचा प्रवास' हा लेख नवोदित कवींना, विशेषत: गझल लिहिणार्‍यांना, उद्बोधक ठरावा असाच आहे.