गझलविषयक लेख

'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना

'...पांडित्याची पगडी डोक्यावर मिरवणार्‍यांना कविता कळते असे समजण्याचे कारण नाही...कविता अंत:करणाला उमजते. असे अंतःकरण तुम्हांला आहे ही भाग्याची गोष्ट आहे...' हे मंगेश पाडगाबकरांचे आशीर्वाद लाभलेल्या या जावडेकर बंधूंचा हा पहिलाच गझल-संग्रह!

मराठी गझल धोक्याच्या वळणावर

गझलच्या नावाने केल्या जाणाऱ्या या सर्व उपक्रमांतून जी गझल वाचकांसमोर, रसिकांसमोर येतेय ती दिसतेय, वाटतेय गझलसारखी पण म्हणून ती गझल नाही. तिच्याकडे गझलत्वाचे शील नाही आणि कवितेचं मोलही नाही. साक्षर माणसाने लिहिलेल्या पद्य ओळी यापेक्षा त्यांचा वेगळा दर्जा असू शकत नाही.

गझलचे दुसरे अंग

जमीन म्हणजे रदीफ आणि काफिया ह्यांची अशी काही चपखल सांगड की ज्याने गझलचा एक विशिष्ट मूड तयार होतो. तो मूड गझलभर पसरतो. आणि गझल वाचकांच्या , रसिकांच्या मनात घर करते. ही जमीन योग्य निवडणे व शेवटपर्यंत सांभाळणे ही मोठी कठीण गोष्ट आहे.

Pages