पिणे सोडले मी….

गळया भोवती नेहमी फास आहे
तरी जिंदगीची मजा खास आहे

अशी भाव खाते जशी अप्सरा ती
तिचा एवढा फक्त मज त्रास आहे !!

(अशी भेटते की कधी भेटली ना !
तिच्या भेटण्याची तऱ्हा खास आहे )

जगाला जरी वाटतो मी यशस्वी
तिच्या सर्व विषयात नापास आहे … !!

नसे राम आता तसा राम बापा
अता दशरथालाच वनवास आहे !

पिणे सोडले मी कधीचे तरीही
मला सांगती ते मुखा वास आहे !

-- अरविंद पोहरकर

गझल: 

प्रतिसाद

(अशी भेटते की कधी भेटली ना !
तिच्या भेटण्याची तऱ्हा खास आहे )
छान.

धन्यवाद चित्तरंजन दा .

वा पोहरकर आपणही गझल करता आहात हे पाहून आनंद झाला
उत्तमोत्तम गझललेखनासठी मनःपूर्वक शुभेच्छा

आपणा सारख्या जेष्ठ / श्रेष्ठ रचनाकारांकडून हळू हळू शिकतो आहे !!! शुभेच्छा करिता धन्यवाद वैभव कुलकर्णी साहेब .

खास आणि नापास हे दोन खास शेर आहेत.

धन्यवाद मुटे सर .