पिणे सोडले मी….
गळया भोवती नेहमी फास आहे
तरी जिंदगीची मजा खास आहे
अशी भाव खाते जशी अप्सरा ती
तिचा एवढा फक्त मज त्रास आहे !!
(अशी भेटते की कधी भेटली ना !
तिच्या भेटण्याची तऱ्हा खास आहे )
जगाला जरी वाटतो मी यशस्वी
तिच्या सर्व विषयात नापास आहे … !!
नसे राम आता तसा राम बापा
अता दशरथालाच वनवास आहे !
पिणे सोडले मी कधीचे तरीही
मला सांगती ते मुखा वास आहे !
-- अरविंद पोहरकर
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 16/07/2014 - 14:22
Permalink
(अशी भेटते की कधी भेटली ना !
(अशी भेटते की कधी भेटली ना !
तिच्या भेटण्याची तऱ्हा खास आहे )
छान.
अरविन्द पोहरकर
शुक्र, 18/07/2014 - 09:36
Permalink
धन्यवाद चित्तरंजन दा .
धन्यवाद चित्तरंजन दा .
वैभव वसंतराव कु...
सोम, 21/07/2014 - 14:01
Permalink
वा पोहरकर आपणही गझल करता आहात
वा पोहरकर आपणही गझल करता आहात हे पाहून आनंद झाला
उत्तमोत्तम गझललेखनासठी मनःपूर्वक शुभेच्छा
अरविन्द पोहरकर
शुक्र, 25/07/2014 - 10:50
Permalink
आपणा सारख्या जेष्ठ / श्रेष्ठ
आपणा सारख्या जेष्ठ / श्रेष्ठ रचनाकारांकडून हळू हळू शिकतो आहे !!! शुभेच्छा करिता धन्यवाद वैभव कुलकर्णी साहेब .
गंगाधर मुटे
गुरु, 31/07/2014 - 13:51
Permalink
खास आणि नापास हे दोन खास शेर
खास आणि नापास हे दोन खास शेर आहेत.
अरविन्द पोहरकर
शनि, 02/08/2014 - 21:57
Permalink
धन्यवाद मुटे सर .
धन्यवाद मुटे सर .