...देऊ नये !
...देऊ नये !


आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये !


तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !


एकटी सोडू नये संधी कधी
दूर संधीला पळू देऊ नये !


खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !


शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !


वेळ गेलेली पुन्हा येईल का ?
वेळ आलेली टळू देऊ नये !!


हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !


कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`


मावळू दे सूर्यही  अन् चंद्रही...
मात्र आशा मावळू देऊ नये !


शक्य हे प्रेमात आहे का कधी...?
- जीव मी माझा जळू देऊ नये...!


ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!


नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !


- प्रदीप कुलकर्णी


गझल: 

प्रतिसाद

गझल फार आवडली.
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !

ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!

नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !

-खास!
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
-एकदम मस्त! (इथे 'अर्थाला'-एकवचनी  का वापरले नाही?)
मतलाही खूप आवडला.
इतकी 'ळू' ने संपणारी क्रियापदे समर्पकपणे वापरणे हे प्रचंड अवघड!

धन्यवाद...
..................................
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
-एकदम मस्त! (इथे 'अर्थाला'-एकवचनी  का वापरले नाही?)
....कारण, वरच्या ओळीत `शब्द` हा शब्द अनेकवचनी वापरला आहे म्हणून !
अनेक शब्द खाणाखुणा करतील....मात्र, त्या त्या शब्दांच्या अर्थांना चळू देऊ नये...शब्द मोहात पाडण्याचा प्रयत्न करतील, पण त्या मोहाला अर्थांना बळी पडू देऊ नये....

शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
वा!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
वाव्वा!!!

विसुनानांसारखीच गझल फार आवडली.

नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
अग्दी मनातल. सुंदर आहे गजल.

संपुर्ण गझलच पर्वणी आहे.

पाय, अर्थ, फूल, हाक आणि प्रेम - शेर खूपच आवडले!!
-- पुलस्ति.

शैलु गुरव
शक्य हे प्रेमात आहे का कधी...?
- जीव मी माझा जळू देऊ नये...!
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
फारच आवडलं.

 

खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !

कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`
मावळू दे सूर्यही  अन् चंद्रही...
मात्र आशा मावळू देऊ नये !
----वा वा प्रदीप्!केवळ अप्रतिम!जिओ.
जयन्ता५२

 
 
जयन्ता५२

प्रदीप,
अप्रतिम गझल... प्रत्येक शेर सुंदर आहे.
आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये ! - किती सहज्-सुंदर!!!!
तोल, संधी, फूल ... प्रत्येक शेर वाचतानाच भिडत गेला.
हाक देताना हळू देऊ नये !! - सुंदर!!!!
- कुमार

गझल फार आवडली.
जगावं कसं याचं उत्तम चित्रण झालं आहे.
तरी खालील ओळींचा अर्थ कळला नाही.
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`
 

तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !..
खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !

शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !..ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!... वा!नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !..प्यार को प्यार हे रहने दो ,कोई नाम ना दो.. ह्या ओळी आठवल्या
अतिशय अर्थपूर्ण, भावपूर्ण शेरांनी सजलेली गझल ..उत्तमच
-मानस६


गजल फारच आवडली. माझं मतही वरील मतांसारखंच...
अजब

वा, वा, प्रदीपदा,
क्या बात है! अख्खं अनुभवविश्व उभं केलंत!!! कोणकोणत्या शेराबद्दल लिहावंं!  ये दिल मांगे मोअर !!! एवढंच म्हणतो मातद्या.अनेक गझला अजून येवू द्या.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

प्रदीप्,तुमची गझल सहज सुन्दर असते. 

सगळेच शेर सही. त्यातही
'हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!'
हे दोन जाम आवडले.
 

नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
हा शेर खासच!
संपूर्ण गझल आवडली प्रदीपराव!

सर्व शेर खास  :  बापू दासरी

अप्रतिम.....अर्थात नेहमीसारखच....
 

हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
वावावा....
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!