...कवितेने दिले !
Posted by प्रदीप कुलकर्णी on Monday, 13 August 2007गझल:
प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो,
प्रत्येक वेळी आणतो ओठांवरी हासू नवे!
गझल
हिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांची एक गझल अलिकडे कविताकोश ह्या वेब-साईटवर वाचण्यात आली.... त्या गझलेतील 'शुक्रिया' हे रदीफ, गझलेतील आशय,शैली, आणि मुख्य म्हणजे साधी भाषा ह्यामुळे ती गझल मनाला भावली..त्यातील काही निवडक शेरांचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय..
घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार
घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.
पाषाणाला शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.
जागत होतो, म्हणून कामे नवी करु शकलो,
हे निद्रे, तू मला सोडले, त्याबद्दल आभार.
आल्या नसत्या तुम्ही; ह्या शिड्या बनल्या असत्या का?
आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्या आरश्यांचे...!
तू नको येऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,भेटता वेळी अवेळी
कोण मी तुझा ?