कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
...मी आहे तिथे !
तू मनापासून कर मज याद...मी आहे तिथे !
घाल केव्हाही मला तू साद...मी आहे तिथे !
नेहमीसाठीच केला वर्ज्य मी तो उंबरा...
हा नको माझ्यावरी अपवाद...'मी आहे तिथे !'
टाळण्य़ाजोगा न मी...भेटा; नका भेटू मला...
मी किती वाटो कुणाला ब्याद....मी आहे तिथे !
आपल्यासाठी कशाला अंतरांची कौतुके ?
साध तू तेथूनही संवाद...मी आहे तिथे !
छेड एकांतात तारा काळजाच्या, तू तुझ्या...
ऐक तू ! येईल माझा नाद !! मी आहे तिथे !
धीर त्यांना द्यायला...त्यांना उभारी द्यायला...
- माणसे सारी जिथे बरबाद...मी आहे तिथे !
का तुला शंका ? तुझ्या मी अंतरी आहेच ना !
घालशी का तू तुझ्याशी वाद ? मी आहे तिथे !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
सुंदरका तुला शंका ? तुझ्या मी अंतरी आहेच ना !
घालशी का तू तुझ्याशी वाद ? मी आहे तिथे !
- वा!-
कुमार जावडेकर
वावा! सुंदर गझल. सगळेच शेर मस्त आहेत. गोटीबंद रचना. काफिये फार चांगले आहेत.
हा नको माझ्यावरी अपवाद...'मी आहे तिथे !' ह्या ओळीत मस्तच.
शेवटचे तीन शेर अधिक आवडले.
वा. वा. सगळे शेर आवडले. काहीतरी वेगळे वाचल्याचा मनमुराद आनंद मिळाला.
सुंदर गझल
आपल्यासाठी कशाला अंतरांची कौतुके ?
साध तू तेथूनही संवाद...मी आहे तिथे !
हा शेर जास्त आवडला
-मानस६
प्रदीप,
सलाम! परिपूर्ण गजल! नेहमीप्रमाणे दर्जेदार!
शुभेच्छा!
जयन्ता५२
जयन्ता५२