सोपे नसते

सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!


दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...


भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!


तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते


उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...


- कुमार जावडेकर, मुंबई


(श्री. चित्तरंजन भट यांनी 'सोपे नसते' ही रदीफ़ सुचवल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!)

गझल: 

प्रतिसाद

मस्त गझल!!
दु:ख - फार फार आवडला! सूर्याचा शेरही छानच...

कुमार,

फारच छान गझल....अप्रतिम....प्रत्येक शेर आवडला....
..................
कुठलीही चमत्कृती नसलेला साधा, सोपा मतला...खूप काही सांगून जाणारा...
...................
सूर्य भोगणे सोपे नसते...
वा...वा...!

म्हणतो.
कुमार  सुरेख गझल... आवडली.
विश्वास

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

वा...................कुमारजी सुरेख गझल.

खुप आवडली. पहिल्या दोन ओळी खुप छान आहेत.

व्वा.......सुरेखच !!
प्रत्येक शेर आवडेश :)

सूर्य भोगणे व जीव लावणे सोपे नसते - हे दोन्ही शेर आवडले.

यावरून एक विचार आला.

सोपे नसते या शब्द समुहाला 'आसॉं नही होता' इतके शब्द आहेत. मात्र कित्येक मराठी शब्दांना त्याहून कमी मात्रांचे शब्द इतर भाषांमधे आहेत.

छान सुबक-ठेंगणी(लांबीबाबत म्हणतोय, अर्थाबाबत नाही) गझल झालीये!

तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते

क्या बात है! अप्रतिम गझल! सगळ्याच द्विपदी सरस.

सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!

व्वा!
उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

व्वा!
तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते

वाव्वा!

गझल आवडली.

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...
अप्रतिम.

अप्रतिम.
असे लिहीणे सोपे नसते.

भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!

उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

हे दोन विशेष आवडले

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

उत्क्रुष्ट रचना.