सोपे नसते
सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!
दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...
भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!
तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते
उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...
- कुमार जावडेकर, मुंबई
(श्री. चित्तरंजन भट यांनी 'सोपे नसते' ही रदीफ़ सुचवल्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!)
गझल:
प्रतिसाद
पुलस्ति
रवि, 26/08/2007 - 19:59
Permalink
वा!
मस्त गझल!!
दु:ख - फार फार आवडला! सूर्याचा शेरही छानच...
प्रदीप कुलकर्णी
रवि, 26/08/2007 - 21:02
Permalink
अप्रतिम
कुमार,
फारच छान गझल....अप्रतिम....प्रत्येक शेर आवडला....
..................
कुठलीही चमत्कृती नसलेला साधा, सोपा मतला...खूप काही सांगून जाणारा...
...................
सूर्य भोगणे सोपे नसते...
वा...वा...!
अनिरुद्ध अभ्यंकर
मंगळ, 28/08/2007 - 22:31
Permalink
हेच
म्हणतो.
कुमार सुरेख गझल... आवडली.
विश्वास
उदय नावलेकर
सोम, 08/02/2010 - 21:13
Permalink
दे अजून; पण - थोडे,
दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...
वा...................कुमारजी सुरेख गझल.
प्रताप
मंगळ, 09/02/2010 - 09:30
Permalink
खुप आवडली. पहिल्या दोन ओळी
खुप आवडली. पहिल्या दोन ओळी खुप छान आहेत.
जयश्री अंबासकर
मंगळ, 09/02/2010 - 12:56
Permalink
व्वा.......सुरेखच !! प्रत्येक
व्वा.......सुरेखच !!
प्रत्येक शेर आवडेश :)
बेफिकीर
मंगळ, 09/02/2010 - 18:34
Permalink
सूर्य भोगणे व जीव लावणे सोपे
सूर्य भोगणे व जीव लावणे सोपे नसते - हे दोन्ही शेर आवडले.
यावरून एक विचार आला.
सोपे नसते या शब्द समुहाला 'आसॉं नही होता' इतके शब्द आहेत. मात्र कित्येक मराठी शब्दांना त्याहून कमी मात्रांचे शब्द इतर भाषांमधे आहेत.
ऋत्विक फाटक
रवि, 14/02/2010 - 09:56
Permalink
छान सुबक-ठेंगणी(लांबीबाबत
छान सुबक-ठेंगणी(लांबीबाबत म्हणतोय, अर्थाबाबत नाही) गझल झालीये!
क्रान्ति
रवि, 14/02/2010 - 10:26
Permalink
तेज, अन् झळा - दोन्ही
तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते
क्या बात है! अप्रतिम गझल! सगळ्याच द्विपदी सरस.
चित्तरंजन भट
रवि, 14/02/2010 - 20:02
Permalink
सत्य बोलणे सोपे नसते... सत्य
सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!
व्वा!
उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...
व्वा!
तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते
वाव्वा!
गझल आवडली.
गंगाधर मुटे
बुध, 17/02/2010 - 05:19
Permalink
दे अजून; पण - थोडे,
दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...
अप्रतिम.
अनिल रत्नाकर
बुध, 17/02/2010 - 13:16
Permalink
अप्रतिम. असे लिहीणे सोपे
अप्रतिम.
असे लिहीणे सोपे नसते.
प्रसाद लिमये
बुध, 17/02/2010 - 15:46
Permalink
भेट आपली घडता कळले - प्रेम
भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!
उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...
हे दोन विशेष आवडले
ह बा
शुक्र, 04/06/2010 - 16:55
Permalink
दे अजून; पण - थोडे,
दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...
उत्क्रुष्ट रचना.