पेंग- दीपक करंदीकर

 

          रात्र बोलते माझ्याशी दिवस रुसून आहे
           चंद्र हासतो पुनवेचा सूर्य डसून आहे


मरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी
मी हताश जन्मापाशी फक्त बसून आहे

झोप लागते विश्वाला पेंग जगाला येते
मीच तरी तुझियासाठी श्वास कसून आहे

पिंजऱ्यातुनी तो तेव्हा दूर उडाला पक्षी
सापळ्यात आयुष्याच्या मीच फसून आहे

अमृतास प्रारंभी मी ओठ लावले होते
तेच वीष ओटीपोटी लूसलुसून आहे

ज्या तुझ्याच होत्या ओळी, अर्थ जे तुझेच होते
तेच गीत ओठी माझ्या आज ठसून आहे

दीपक करंदीकर
१०४४/४/२, 'दर्शन ',  गायआळी
रहाळकर राम मंदिरासमोर
सदाशिव पेठ, पुणे-४११ ०३०.
भ्रमणध्वनी- ९४२३००७०३५

प्रतिसाद

मरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी
मी हताश जन्मापाशी फक्त बसून आहे

श्री. गंभीर समीक्षक, हे वर  तुम्ही  जे काही  केले  आहे, त्याला  'समीक्षा' म्हणवत  नाहीये. हे  नुसतेच  शब्दार्थासह  स्पष्टिकरण झाले. आणि असे  शब्दार्थ  समजाऊन सांगण्याइतके  इथे कुणीही  दुधखुळे नाही, हे नम्रपणे  सांगू  इच्छितो.
बाकी  एकंदर  तुमची समीक्षा  बरी  असते. बाळबोधपणा  थोडा  कमी  केलात  तर  बरे  होईल. या  समीक्षेला  गुण- १०० पैकी  २१.
सर्वांनाच कळकळीची  विनंती-
इथे  लिहीणारे (दोन-चार  सन्माननीय  अपवाद  वगळता) सर्वजण  गझलेचे  विद्यार्थी  आहेत. प्रत्येकाचेच  काही  शेर  जमतात, काही  फसतात. प्रतिसाद  देतांना  चुका  निदर्शनास  आणून  द्याव्या, प्रोत्साहन  द्यावे. पण  कुणाच्याही  गझलेची  टवाळी  करू  नये.  असे  करण्याचा  कुणालाच  हक्क  नाही.
विश्वस्तांनी  कृपया  कुत्सित  टीप्पणी  करणारे  प्रतिसाद  प्रकाशित  होऊ  देऊ  नयेत, ही  विनंती !

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.  प्रतिसाद संपादित करण्यात  आला आहे.

 सर्वजण  गझलेचे 
विद्यार्थी  आहेत. प्रत्येकाचेच  काही  शेर  जमतात, काही 
फसतात. प्रतिसाद  देतांना  चुका  निदर्शनास  आणून  द्याव्या, प्रोत्साहन 
द्यावे. पण  कुणाच्याही  गझलेची  टवाळी  करू  नये.  असे  करण्याचा 
कुणालाच  हक्क  नाही.
हे सर्वांनी लक्षात ठेवावे असे आहे


माहितीसाठी
सदस्याचे प्रतिसाद बघून त्याला परवानगीशिवाय प्रतिसाद पाठवण्याची सोय देण्यात येते. काही महिन्यांपूर्वी कुठल्याही सदस्याला प्रतिसाद पाठविण्यासाठी परवानगी लागत नसे.  हा तेव्हाचा प्रतिसाद असावा. असे असले तरी अनेकदा घाईगडबडीत संपूर्ण प्रतिसाद वाचणे शक्य होत नाही. प्रतिसाद्याचे नाव बघून बरेचदा प्रतिसादांना गठ्ठ्याने परवानगी दिली जाते. एखाद्या प्रतिसाद देणार्‍याच्या प्रतिसादांचा इतिहास बघून योग्य ती कारवाई करण्यात येते.

महत्त्वाचे
ह्या संकेतस्थळाच्या प्रशासनाचे काम एकहातीच आहे. अशावेळी आढळेल तसे सदस्यांनी (ज्ञानेश ह्यांच्याप्रमाणे)हिणकस प्रतिसाद, आक्षेपार्ह लिखाण प्रशासनाच्या (म्हणजे विश्वस्तांच्या) लक्षात आणून द्यायला हवे.

जबरदस्त

आपली गझल जबरदस्त आहे.


          रात्र बोलते माझ्याशी दिवस रुसून आहे
           चंद्र हासतो पुनवेचा सूर्य डसून आहे

                                             या ओली अतिशय छान आहेत.

अतिशय महान गझल आहे ही.
आम्ही तर वाचता वाचताच टाळ्या वाजवत होतो.

मरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी            .. सुंदर ओळ
कलोअ चूभूद्याघ्या

झोप लागते विश्वाला पेंग जगाला येतो
मीच तरी तुझियासाठी श्वास कसून आहे

अप्रतिम!!!