गझल - संगीता जोशी

डाव फिरुनी मांडला तो ही चुकीचा
एक फासा टाकला तो ही चुकीचा...

टाकले पाऊल ते होते  चुकीचे
मार्ग जो मी शोधला तो ही चुकीचा...

हे करू की ते करू ह्या संभ्रमी मी
का दिला सल्ला मला? तो ही चुकीचा?

मौन मुद्दामून होते पाळले मी
अर्थ त्यांनी काढला तो ही चुकीचा

व्हायचे होतेच ते होऊन गेले
ज्योतिषी कसला भला? - तो ही चुकीचा

जीवनाला ताल नाही, मेळ नाही
सूर जो मी लावला तो ही चुकीचा


संगीता जोशी

ए१, भूषण अपार्टमेंट्स
११/२, कर्वेनगर
कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ
पुणे-४११ ०५२.
भ्रमणध्वनी- ९८९०४५६२०२

 

 

 

 


 

 

प्रतिसाद

गझल खुपच छान  !!!

डाव फिरुनी मांडला तो ही चुकीचा
एक फासा टाकला तो ही चुकीचा...
टाकले पाऊल ते होते  चुकीचे
मार्ग जो मी शोधला तो ही चुकीचा...वाव्वा. गझल फार आवडली.

दुसर्या मिसर्यात कफिला सद्रुश्य शब्द दोनदा आला आहे. चुकिचे ...चुकिचा..
असे चालु शकते क? क्रुपया मार्ग्दर्शन करवे.

जीवनाला ताल नाही, मेळ नाही
सूर जो मी लावला तो ही चुकीचा

तसेच
टाकले पाऊल ते होते  चुकीचे
मार्ग जो मी शोधला तो ही चुकीचा...

हे ही आवडले

चिंतनीय मुद्दे. टाकले पाऊल व ज्योतिषाचा शेर चांगला आहे. प्रदीप इन्दुलकर नॉट व्हेरिफाईड यांच्याशी मी सहमत नाही. फैज यांच्या या ओळी बघा:
बात बससे ( उर्दू बस बर का? हल्ली इन्ग्लीश वापरता येते असे दिसल्यामुळे सांगणे आवश्यक )
बात बससे निकल चली है
दिल की हालत संभल चली है
अब जुनूं हदसे बढ चला है
अब तबीअत बहल चली है
तेव्हा:
नोंद येण्याची न केली, का न जाणे?
लांबुनी इस्ला दिला, तोही चुकीचा!
 
 

बाणाला नैराश्य आले आहे हा भाता बघून! याचा अर्थ या भात्यातील बाण परिणामकारक आहेत.
हे बाण मुळीच चुकीचे सोडलेले नाहीत.
खांदा दुसर्‍याचा का वापरला हा प्रश्न आहे बाणाला!
 

संगीता  जोशी  यांची  गझल उत्तम.

"मौन मुद्दामून होते पाळले मी
अर्थ त्यांनी काढला तो ही चुकीचा"
मस्त च !!! खुपच छान...