स्वातंत्र्य

जखमेवरुन खपली काढू नकोस माझ्या;
आधीच रक्त नाही देहात फार माझ्या.

घायाळ पाखराने घ्यावी नवी भरारी;
नभ हे मुठीत यावे तैसे करात  माझ्या.

देहात आग जळते आगीत देह जळतो;
जळण्याशिवाय सखये नशिबात काय  माझ्या.

नेऊ नको मला त्या स्वप्नात तारकांच्या;
डोळ्यात चंद्र तारे रडतात खूप  माझ्या.

स्वातंत्र्य जीवनाला होईल प्राप्त केव्हा;
माझाच कैदखाना कैदेत मीच माझ्या.

                             - मनोज सोनोने
                             
  संवेदना रायटर्स कंम्बाईन,
                               अकोला.

[अकारान्त अन्त्ययमके असल्याने विचाराधीन करण्यात येत आहे--विश्वस्त]

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

माफ करा! पण या खालील शेरांचे अर्थ मला कळले नाहीत. आता अर्थ समजला नाही असे लिहिणे हा प्रतिसाद होऊ शकतो का नाही ते मला माहित नाही.
घायाळ पाखराने घ्यावी नवी भरारी;
नभ हे मुठीत यावे तैसे करात  माझ्या.

नेऊ नको मला त्या स्वप्नात तारकांच्या;
डोळ्यात चंद्र तारे रडतात खूप  माझ्या.


स्वातंत्र्य जीवनाला होईल प्राप्त केव्हा;
माझाच कैदखाना कैदेत मीच माझ्या.