दोन श्वासात

दोन श्वासात बीजाला कधी कोम्ब येत नाही
पापणीत अश्रु दाटे त्याचे दव होत नाही

ओठ गाली चुम्बीतात फिरे बटेतून हात
घेतले नुसते मिठीत त्याने प्रेम होत नाही

सूर्य अस्तास पावतो चन्द्र रात जागवितो
चन्द्र नसता चान्दणे तेथे भय येत नाही

गात आहे कोकिला ती प्रेमे वसन्त ऋतूत
रंग काळा प्रकटला त्याचे कुहू होत नाही

प्रेमभंग झाला तया वाटे जीवन संपले
प्रेम ज्याचे जीवनावर त्याचे वय होत नाही

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

कल्पना चांगल्या आहेत. गझलेचे नियम, व्याकरण आत्मसात करून तंत्रशुद्ध गझल लिहावी, ही विनंती.  ही रचना तंत्रशुद्ध गझल नसल्याने विचाराधीन ह्या विभागात सावकाश हलविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी.