शब्दांत प्राण आले


आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले


तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले


विश्वास जिंकण्याचा त्यांनी ठराव केला
जे जे म्हणाल तुम्ही ते ते करू म्हणाले


आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले


कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!



गझल: 

प्रतिसाद

वा. मस्त गझल.

आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले

सुंदर मतला. खालची ओळ ´आता कुठे जरासे प्राणात प्राण आले!´ अशी कराविशी वाटली.
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
वावा.

गझल आवडली.
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
वा वा.


सुंदर ग़ज़ल. मतला सही आहे. इतर शेर ही छान आहेत.
सानी मिसर्‍यात चित्तरंजनची सुधारणा पटली.
एक चांगल्या ग़ज़लेचा आस्वाद घेता आला.
 ---अगस्ती
 

चित्तरंजन,
तू सुचवलेल्या बदलाने शेराचा अर्थ बदलतो असं मला वाटतं. "शब्दात प्राण आले" मधून 'शब्दांना अर्थ प्राप्त झाला, शब्द जीवंत झाले,आतापर्यंत नुसती तुकबंदी करत होतो' असा अर्थ ध्वनित होतो. "प्राणात प्राण आले" केल्यास 'हुश्श, झालं बुवा लिहून एकदाचं, आता माझ्या जीवात जीव आला' असं काहीसं वाटतं.

"प्राणात प्राण आले" केल्यास 'हुश्श, झालं बुवा लिहून एकदाचं, आता माझ्या जीवात जीव आला' असं काहीसं वाटतं.
हा चांगला मुद्दा आहे. पण वरील अर्थाशिवाय इतर अर्थ घेता येणार नाहीत काय?  
 ´आता कुठे जरासे माझे जगून झाले´ अशी वरची ओळ केली तर खालच्या ओळीच्या ´प्राणात प्राण´ आणता येत नाही.
असो. मुळात मतला इतका चांगला आहे की बदलाची गरज नाही.
चित्तरंजन भट

सगळे शेर् आवडले.

 
कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!
सुंदर..!
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले
अतिशय सुंदर..!
 

'दूरस्थ दु:खितांचे' फार मस्त आहे.

माझ आत्येभाऊ डेट्रोईटला असतो...!?

तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले.. सही..
गझल आवडली
मानस६

आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
सुन्दर! तुमच्या या शब्दानी काही अनुभव पुन्हा जिवन्त झाले. धन्यवाद.

ॐकारराव,
आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले

तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले

कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!
  मस्तच..!!

यंदाच्या दिवाळीत अशाच गझलांला उपहार अपेक्षीत आहे.
आम्ही वाट पाहतोय...

सोनालीशी सहमत!
दर्जेदार रचना!

जयन्ता५२

सुंदर गझल.. सगळेच शेर आवडले.
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले ... सुंदर.
'मारेकरी'चा शेरही आवडला, मतलाही.
- कुमार

आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले

सुंदर गझल.. सगळेच शेर आवडले!!!