शब्दांत प्राण आले
आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले
विश्वास जिंकण्याचा त्यांनी ठराव केला
जे जे म्हणाल तुम्ही ते ते करू म्हणाले
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
कंपूत पांढर्यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 17/04/2007 - 11:21
Permalink
वा!
वा. मस्त गझल.
आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले
सुंदर मतला. खालची ओळ ´आता कुठे जरासे प्राणात प्राण आले!´ अशी कराविशी वाटली.
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
वावा.
मिलिंद फणसे
मंगळ, 17/04/2007 - 13:01
Permalink
गझल
गझल आवडली.
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
वा वा.
अगस्ती
मंगळ, 17/04/2007 - 13:56
Permalink
सुंदर
सुंदर ग़ज़ल. मतला सही आहे. इतर शेर ही छान आहेत.
सानी मिसर्यात चित्तरंजनची सुधारणा पटली.
एक चांगल्या ग़ज़लेचा आस्वाद घेता आला.
---अगस्ती
मिलिंद फणसे
मंगळ, 17/04/2007 - 15:59
Permalink
चित्तरंजन,
चित्तरंजन,
तू सुचवलेल्या बदलाने शेराचा अर्थ बदलतो असं मला वाटतं. "शब्दात प्राण आले" मधून 'शब्दांना अर्थ प्राप्त झाला, शब्द जीवंत झाले,आतापर्यंत नुसती तुकबंदी करत होतो' असा अर्थ ध्वनित होतो. "प्राणात प्राण आले" केल्यास 'हुश्श, झालं बुवा लिहून एकदाचं, आता माझ्या जीवात जीव आला' असं काहीसं वाटतं.
चित्तरंजन भट
मंगळ, 17/04/2007 - 17:27
Permalink
इतर अर्थ
"प्राणात प्राण आले" केल्यास 'हुश्श, झालं बुवा लिहून एकदाचं, आता माझ्या जीवात जीव आला' असं काहीसं वाटतं.
हा चांगला मुद्दा आहे. पण वरील अर्थाशिवाय इतर अर्थ घेता येणार नाहीत काय?
´आता कुठे जरासे माझे जगून झाले´ अशी वरची ओळ केली तर खालच्या ओळीच्या ´प्राणात प्राण´ आणता येत नाही.
असो. मुळात मतला इतका चांगला आहे की बदलाची गरज नाही.
चित्तरंजन भट
सोनाली जोशी
मंगळ, 17/04/2007 - 19:46
Permalink
मस्त्
सगळे शेर् आवडले.
प्रदीप कुलकर्णी
बुध, 18/04/2007 - 22:53
Permalink
कंपूत
कंपूत पांढर्यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!
सुंदर..!
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले
अतिशय सुंदर..!
चित्तरंजन भट
गुरु, 19/04/2007 - 12:05
Permalink
'दूरस्थ दु:खितांचे'
'दूरस्थ दु:खितांचे' फार मस्त आहे.
विसुनाना
गुरु, 19/04/2007 - 15:10
Permalink
;)
माझ आत्येभाऊ डेट्रोईटला असतो...!?
मानस६
गुरु, 18/10/2007 - 23:21
Permalink
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले.. सही..
गझल आवडली
मानस६
गणेशप्रसाद
शुक्र, 19/10/2007 - 13:31
Permalink
नवी गझल
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
सुन्दर! तुमच्या या शब्दानी काही अनुभव पुन्हा जिवन्त झाले. धन्यवाद.
बेभान
शुक्र, 19/10/2007 - 18:05
Permalink
नितांत सुंदर...
ॐकारराव,
आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले
कंपूत पांढर्यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले! मस्तच..!!
यंदाच्या दिवाळीत अशाच गझलांला उपहार अपेक्षीत आहे.
आम्ही वाट पाहतोय...
जयन्ता५२
सोम, 22/10/2007 - 10:14
Permalink
सहमत!
सोनालीशी सहमत!
दर्जेदार रचना!
जयन्ता५२
कुमार जावडेकर
गुरु, 25/10/2007 - 22:26
Permalink
वा!
सुंदर गझल.. सगळेच शेर आवडले.
तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले ... सुंदर.
'मारेकरी'चा शेरही आवडला, मतलाही.
- कुमार
चक्रपाणि
गुरु, 25/10/2007 - 22:37
Permalink
सहमत
आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
ह बा
शनि, 19/06/2010 - 11:54
Permalink
आरोप ऐकताना तो आपसूक
आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले
सुंदर गझल.. सगळेच शेर आवडले!!!