समर्पण : डॉ. श्रीकृष्ण राऊतसमर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.

 

झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.

 

आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!

 

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

 

शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते.

 

(असंग्रहित/प्रसिद्धी: कविता-रती/दिवाळी अंक २००४)        

प्रतिसाद

स्वागत....

झोप सुखाची, चैन जिवाची, खुशी मनाची;
अशी आपली दौलत सारी प्रेम मागते.

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

छान... हे शेर खूप आवड़ले...

आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!

कधी रातच्या विलायचीला नाही म्हणते;
कधी दुपारी पान सुपारी प्रेम मागते.

सुंदर गझल. हा शेर अतीशय सुंदर.

मस्त गझल आहे.
आनंदाचे देणे-घेणे करते नगदी;
आठवणींची किती उधारी प्रेम मागते!
हा शेर फार फार आवडला.

वा वा !! अप्रतिम गझल.

शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते.

क्या बात कही है !!!

आपला,
(प्रभावित) धोंडोपंत


 

आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गझलप्रेमी
सर्वश्री प्रदीप कुलकर्णी,समीर चव्हाण ,
उदय नावलेकर ,चित्तरंजन भट,
आणि
(प्रभावित) धोंडोपंत,
आपण दिलेली दिलखुलास दाद


अधिक चांगलं लिहायला उर्जा देत राहील.


आपले मनःपूर्वक आभार


आणि


दिवाळीसह आपल्या गझललेखनास


हार्दिक शुभेच्छा.


-डॉ.श्रीकृष्ण राऊत