सांग कोठे माणसा आहेस तू

सांग कोठे माणसा आहेस तू ?
चित्तरंजन भट कसा आहेस तू ?

तू हिरा जर पाडले पैलू तुला
जाळले तर कोळसा आहेस तू !

काय दिसते तेच दाखवतोस ना ?
एक साधा आरसा आहेस तू !

हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू

बोल ना काहीतरी चिमटाच घे
दे जरासा भरवसा आहेस तू !

गझल: 

प्रतिसाद

वा...... क्या बात है !!
किती सहज ....... !!

मस्तच! अतिशय सहज आणि दमदार.. नेहमीप्रमाणे.

स्वताकडे इतक्या तटस्थपणे पहाणे जमले आहे तुम्हाला म्हणून गझल केवळ अप्रतिम .

सर्वच शेर आवडले.
मात्र
तू हिरा जर पाडले पैलू तुला
जाळले तर कोळसा आहेस तू !

काय दिसते तेच दाखवतोस ना ?
एक साधा आरसा आहेस तू !

हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू

हे अधिक आवडलेत.

मस्त... सुरेख गझल...

छानच रे..

सुंदर गझल आहे. मनापासून आवडली.

हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
अप्रतिम शेर … क्या बात है

Badhiyaa gazal!

Outstanding !!

Dhanywad !!

मतला ते शेवटचा शेर ... किती किती सुंदर आहे ... व्वाह सर!!!

खूप खूप धन्यवाद!

हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
वा ! विरोधाभासातून अप्रतिम अद्वैत साधलत आपण. फार मोठे तत्त्वज्ञान दर्शवतो हा शेर. अवघी एकाचीच विण I तेथ कैचे भिन्न भिन्न II या ज्ञानेश्वराच्या ओवीचे स्मरण झाले.