सांग कोठे माणसा आहेस तू
सांग कोठे माणसा आहेस तू ?
चित्तरंजन भट कसा आहेस तू ?
तू हिरा जर पाडले पैलू तुला
जाळले तर कोळसा आहेस तू !
काय दिसते तेच दाखवतोस ना ?
एक साधा आरसा आहेस तू !
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
बोल ना काहीतरी चिमटाच घे
दे जरासा भरवसा आहेस तू !
गझल:
प्रतिसाद
जयश्री अंबासकर
शुक्र, 04/05/2012 - 13:42
Permalink
वा...... क्या बात है !! किती
वा...... क्या बात है !!
किती सहज ....... !!
बहर
शुक्र, 04/05/2012 - 15:41
Permalink
मस्तच! अतिशय सहज आणि दमदार..
मस्तच! अतिशय सहज आणि दमदार.. नेहमीप्रमाणे.
कमलाकर देसले
शुक्र, 11/05/2012 - 11:17
Permalink
स्वताकडे इतक्या तटस्थपणे
स्वताकडे इतक्या तटस्थपणे पहाणे जमले आहे तुम्हाला म्हणून गझल केवळ अप्रतिम .
गंगाधर मुटे
शुक्र, 25/05/2012 - 12:19
Permalink
सर्वच शेर आवडले. मात्र तू
सर्वच शेर आवडले.
मात्र
तू हिरा जर पाडले पैलू तुला
जाळले तर कोळसा आहेस तू !
काय दिसते तेच दाखवतोस ना ?
एक साधा आरसा आहेस तू !
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
हे अधिक आवडलेत.
प्रदीप कुलकर्णी
सोम, 27/08/2012 - 14:02
Permalink
मस्त... सुरेख गझल...
मस्त... सुरेख गझल...
विसोबा खेचर
गुरु, 13/09/2012 - 17:13
Permalink
छानच रे..
छानच रे..
गणेशप्रसाद
गुरु, 24/07/2014 - 14:41
Permalink
सुंदर गझल आहे. मनापासून आवडली
सुंदर गझल आहे. मनापासून आवडली.
अरविन्द पोहरकर
शुक्र, 25/07/2014 - 10:45
Permalink
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
अप्रतिम शेर … क्या बात है
बेफिकीर
बुध, 30/07/2014 - 19:52
Permalink
Badhiyaa gazal!
Badhiyaa gazal!
supriya.jadhav7
शुक्र, 22/08/2014 - 00:08
Permalink
Outstanding !! Dhanywad !!
Outstanding !!
Dhanywad !!
जयदीप
शुक्र, 22/08/2014 - 07:51
Permalink
मतला ते शेवटचा शेर ... किती
मतला ते शेवटचा शेर ... किती किती सुंदर आहे ... व्वाह सर!!!
खूप खूप धन्यवाद!
बाळ पाटील
सोम, 08/09/2014 - 11:45
Permalink
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का
हा तुझ्यामाझ्यात इतका भेद का ?
मी जसा अगदी तसा आहेस तू
वा ! विरोधाभासातून अप्रतिम अद्वैत साधलत आपण. फार मोठे तत्त्वज्ञान दर्शवतो हा शेर. अवघी एकाचीच विण I तेथ कैचे भिन्न भिन्न II या ज्ञानेश्वराच्या ओवीचे स्मरण झाले.