....सारे मला मिळाले !!! (गझल).
....सारे मला मिळाले !!! (गझल).
.
*
काही न मागताही सारे मला मिळाले ,
केसात माळले मी , तारे मला मिळाले !
*
मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,
नेत्रात दोन अश्रू खारे मला मिळाले !
*
वाटेतल्या फ़ुलांचे काटेच बोचलेले ,
एकेक घांव ताजे कारे मला मिळाले ?
*
गाठू कसा किनारा , लाटेस ओढ भारी ,
ते स्वैर वाहणारे वारे मला मिळाले !
*
मी आजही भुकेली एका अलिंगनाची ,
मौनातले उसासे सारे मला मिळाले !
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
रवि, 10/10/2010 - 11:26
Permalink
शेवटचा सुंदर!!
शेवटचा सुंदर!!
supriya.jadhav7
रवि, 10/10/2010 - 13:08
Permalink
धन्यवाद आनंदयात्री ! इथली ही
धन्यवाद आनंदयात्री !
इथली ही माझी पहिलीच गझल ....
जाणकारांचे मार्गदर्शन मोलाचे.
-सुप्रिया.
शाम
सोम, 11/10/2010 - 09:05
Permalink
मोडून मांडला तू मांडून
मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,..काय ते कळायला हवे... ना?
आणि..
वाटेतल्या फ़ुलांचे ते बोचलेच काटे
एकेक घाव ताजे, का रे मला मिळाले?....
असे केल्यास बोचलेले मधील शेवटचा जास्तीचा 'ले' टाळता येईल असे वाटते.
बाकी छान !
वैभव देशमुख
सोम, 11/10/2010 - 16:22
Permalink
आनंदयात्रीशी सहमत.....
आनंदयात्रीशी सहमत.....
क्रान्ति
सोम, 11/10/2010 - 17:59
Permalink
मौनातले उसासे खूप खूप आवडला.
मौनातले उसासे खूप खूप आवडला.
supriya.jadhav7
मंगळ, 12/10/2010 - 11:35
Permalink
श्यामजी , आपल्या मौलिक सुचना
श्यामजी , आपल्या मौलिक सुचना निश्चीतच प्रेरणादायी ठरतील.
वैभवजी , क्रांन्तिजी ...
मनःपूर्वक आभारी आहे सगळ्यांची.
-सुप्रिया.
सुरेश शिरोडकर
मंगळ, 12/10/2010 - 22:22
Permalink
छान गझल!! मौनातले उसासे खूप
छान गझल!!
मौनातले उसासे खूप आवडला
ह बा
सोम, 18/10/2010 - 16:33
Permalink
सगळेच शेर छान अगदी सहज आले
सगळेच शेर छान अगदी सहज आले आहेत.
बेफिकीर
मंगळ, 19/10/2010 - 01:56
Permalink
शेवटचा शेर चांगला
शेवटचा शेर चांगला आहे.
-'बेफिकीर'!
supriya.jadhav7
बुध, 20/10/2010 - 09:36
Permalink
सुरेशजी... ह्.बा.जी... 'बेफिक
सुरेशजी...
ह्.बा.जी...
'बेफिकीर'...
मनःपूर्वक धन्यवाद!
चित्तरंजन भट
रवि, 24/10/2010 - 10:48
Permalink
शेवटची द्विपदी विशेष आहे.
शेवटची द्विपदी विशेष आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.
मिलिन्द हिवराले
सोम, 01/11/2010 - 17:51
Permalink
वा, क्या बात है...!
वा, क्या बात है...!