....सारे मला मिळाले !!! (गझल).

....सारे मला मिळाले !!! (गझल).
.
*

काही न मागताही सारे मला मिळाले ,
केसात माळले मी , तारे मला मिळाले !

*

मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,
नेत्रात दोन अश्रू खारे मला मिळाले !

*

वाटेतल्या फ़ुलांचे काटेच बोचलेले ,
एकेक घांव ताजे कारे मला मिळाले ?

*

गाठू कसा किनारा , लाटेस ओढ भारी ,
ते स्वैर वाहणारे वारे मला मिळाले !

*

मी आजही भुकेली एका अलिंगनाची ,
मौनातले उसासे सारे मला मिळाले !

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: 

प्रतिसाद

शेवटचा सुंदर!!

धन्यवाद आनंदयात्री !

इथली ही माझी पहिलीच गझल ....

जाणकारांचे मार्गदर्शन मोलाचे.

-सुप्रिया.

मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,..काय ते कळायला हवे... ना?

आणि..
वाटेतल्या फ़ुलांचे ते बोचलेच काटे
एकेक घाव ताजे, का रे मला मिळाले?....
असे केल्यास बोचलेले मधील शेवटचा जास्तीचा 'ले' टाळता येईल असे वाटते.

बाकी छान !

आनंदयात्रीशी सहमत.....

मौनातले उसासे खूप खूप आवडला.

श्यामजी , आपल्या मौलिक सुचना निश्चीतच प्रेरणादायी ठरतील.

वैभवजी , क्रांन्तिजी ...

मनःपूर्वक आभारी आहे सगळ्यांची.

-सुप्रिया.

छान गझल!!
मौनातले उसासे खूप आवडला

सगळेच शेर छान अगदी सहज आले आहेत.

शेवटचा शेर चांगला आहे.

-'बेफिकीर'!

सुरेशजी...
ह्.बा.जी...
'बेफिकीर'...

मनःपूर्वक धन्यवाद!

शेवटची द्विपदी विशेष आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

वा, क्या बात है...!