कविता जुळून आली..
सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!
तेजाळल्या दिव्याच्या वातीस हे विचारा..
हे अग्निदिव्य करण्या, ती का जळून आली?
हा संपणार नाही रस्ता कधी व्यथेचा..
ती वाट का नव्याने येथे वळून आली?
जो काय कौल आहे, तो दे, 'असा', 'तसाही'..
पाहून वाट आता गात्रे गळून आली!
सोडून सौख्य गेले वाटेत आज अर्ध्या..
कळताच 'एकटा' मी, दुःखे वळून आली!
-- बहर.
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 20/09/2010 - 12:50
Permalink
सलताच वेदना ती, कविता जुळून
सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!
वा.. मस्त मतला.. फार आवडला..
गझल आवडली,राहुल.
गंगाधर मुटे
मंगळ, 21/09/2010 - 16:31
Permalink
सलताच वेदना ती, कविता जुळून
सलताच वेदना ती, कविता जुळून आली..
सृजनास वेदनेची महती कळून आली!
व्वा. फार सुंदर
ज्ञानेश.
बुध, 22/09/2010 - 13:32
Permalink
सुरेख गझल, बहर. शेवटचा शेर तर
सुरेख गझल, बहर.
शेवटचा शेर तर फारच आवडला.
कळताच 'एकटा' मी, दुःखे वळून आली!
व्वा..
बहर
बुध, 22/09/2010 - 16:56
Permalink
डॉक्टरसाहेब.. मुटेजी.
डॉक्टरसाहेब.. मुटेजी. ज्ञानेशजी.. प्रतिसादांबद्दल अनेक आभार.