सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी !
ज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते ?
यापुढे
पुलस्ति [30 ऑगस्ट 2008]
मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे
हे अर्थ-लेख, हे...चवदार आकडे!
ताटात हेच घ्या; वाढून यापुढे
"कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या..."
मी लाजवूच का... बोलून यापुढे?
मी दचकलो असा, हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"
बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...
गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का; जागून यापुढे...
मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
काय शोधतो ते आठवेचना ही ओळ उत्कृष्ट आहे.
मी काय शोधतो ते आठवेचना ...वाह!
मी काय शोधतो ते आठवेचना
वाह
मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...
किती छान विरोधाभास मांडला आहे.
गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
छान...!
मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...
उत्तम !
मनापासून शुभेच्छा...
मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...
वाव्वा!
मी दचकलो असा, हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"
वा!
गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
वा!
पुलस्ति, गझल एकंदर चांगली झाली आहे.
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.