वेश्या बरी

मुद्दा कितीही जरी चूक आहे
तिची बेवफाईही नाजूक आहे


मला वागवी हल्ली मी ही असा
जणू मी मलाही आगंतूक आहे


वेश्या बरी मोह माझे असे
सुधराय जाताच शुकशूक आहे


रात्री तरी करशी काळे, तुझे
सूर्या तयानेच कौतूक आहे


़कधीही बघा देव निर्लज्ज नी
दिसण्यास नुसता साजूक आहे


भीती दाखवा त्यांस मृत्यूची रे
जगायाची ज्याला इथे भूक आहे


तुझे रूप चांदीची संदूक आहे
बस जीभ ही फक्त बंदूक आहे


निराशेस लावीन पळवून मी
आशा किती माझी अंधूक आहे


सवय लागली शुद्ध्तेची मला
करी चूक जी चूक बिनचूक आहे


 


Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

वरील गझलेत एकच वृत्त पाळले गेलेले नाही. एका दिवसात ह्यात काही बदल झाला नाही तर ही रचना विचाराधीन करण्यात येईल. ह्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.

विश्वस्त