साप

सापाची बिनचावर्‍या जात माझी
दुर्मीळ आहे तशी कात माझी


किती लांब आयुष्य देशील देवा
दमछाक झाली मैलात माझी


कोणी मिळेना जो ईर्शाद करतो
अब्रूच नाही समाजात माझी


मी व्हायचे नेमके कोण गेली
साताठ दशके ठरवण्यात माझी


तिचे रेशमी  भास नी आठवण
अशी जात आहे दर रात माझी

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

मला वाटते तुम्ही जरा मात्रा मोजून पहा. थोडी विसंगती वाटते.