कोणी आपले

चल मना बघुयात कोणी आपले मिळतेय का
आतुनी नसुदेत वरवर कोणी तळमळतेय का


मागणी नशिबाची करता देव डाफरला मला
पीठ आला खायला कुणी आंधळे दळतेय का


चौक आला नेहमीचा घर तिचे डावीकडे
पाहुया पाऊल हे उजवीकडे वळतेय का


आज ती नाहून गेली नदिकिनारी एकटी
प्रश्न गावाला पडे की ही नदी जळतेय का


पापण्या आतून बघतो शांतता मज लाभते
लोचने खुलताच चिंता 'धार ओघळतेय का'


साफ मन घेऊन मी आरंभिले जन्मास या
ना कळे कोणामुळे अन एवढे मळतेय का


ताण देऊन खेचतो, एकेक अक्षर शोधतो
आवरा कवितेस कोणी सारखी पळतेय का


शब्द ना बाहेर यावे  जे मला असती हवे
त्यामुळे ती ओढणीचा फास आवळतेय का


अर्धमेल्या ऊंदराला काक पाहूनी म्हणे
सोडतोका प्राण बघुया दैव फळफळतेय का


बेवफाई लपविण्या ती सारखी पुसते मला
हे तुला पटतेय का अन हे तुला कळतेय का


 


 


 


 


 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

गझलेसाठी आपल्याकडे नवे विचार (चांगले-वाईट दोन्ही) आहेत, आवश्यकता आहे थोड्या शिस्तीची न धीराची...
या गोष्टी तुम्हाला लाभो...
पुढील भटांचे शब्द आपण सगळ्यनीच ध्यानात ठेवायला हवेत:
केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार
शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता
शक्तिशाली बनत नसते.समीरराव हे कसे ? एकदम योग्य बोललात !! पण भटांचे हेच तत्व आपल्या गझलकार मंडळींकडून मधे मधे पाळले जात नाही. म्हणून अशी मधे मधे एकमेकांना एकमेकांनी आठण देत राहणे उत्तम आहे. त्यात कुणीच राग मानू नये हेही महत्वाचे . भूषणरावांना राग येणार नाही कारण त्यांनी यादगारना एक प्रतिसाद दिला आहेच.

केवळ अन्यायच नसतो या दुनियेमध्ये
भिन्न भिन्न विषयांना येवो जाग माणसा
प्रेमही यावे,विरहही यावा,धारही यावी
फक्त मनामध्ये न यावा राग माणसा

राव वगैरे नका म्हणु राव. पण मार्गदर्शन चालू ठेवावेत.

स्पष्टपणे म्हणावेसे वाटते की माझी तथाकथित गझल हीन झाली तरी चालेल पण इतरांमुळे ती जास्त प्रभावै वगैरे होउ नये.

ह्या संकेतस्थळावर वैयक्तिक स्वरूपाचे शेरे आणि एकंदरच वातावरण कलुषित होईल असे लेखन टाळावे. लिखाणावर चर्चा करावी; लेखकावर नव्हे. 

सुरेशभटांच्या नावे चालविल्या जाणार्‍या ह्या संकेतस्थळावर गरज भासेल तेव्हा असे लेखन, प्रतिसाद संपादित करण्याचे किंवा काढून टाकण्याचे अधिकार संकेतस्थळाकडे आहेत, ह्याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि कृपया सहकार्य करावे, ही विनंती.

आपण मर्दुमकीची भाषा हटविल्याबद्दल आपले धन्यवाद!
आपल्या शिस्तीच्या अपेक्षेबद्दलही धन्यवाद!
माझी अशी विनंती आहे की उर्दुमधे गझलची व्याख्या काय होती व कोणी केली होती हे कृपया चर्चेला घ्यावेत.
याने फक्त एवढेच साध्य होईल की ज्यांनी हा प्रकार निर्मीला त्यांना काय म्हणायचे होते ते समजेल.