दुर्भाग्य

ओठावर माझ्या शब्द नव्हते, पण डोळ्यात माझ्या भाव होते !
ते तुजला कळले नाही,हेच माझे दुर्भाग्य होते !!१!!
पोहचतील शब्द तुजपर्यंत,मज असे वाटत होते !
विरुनी जातील वाटेतच शब्द ,असे मला तरी कोठे माहित होते !!२!!
ह्रदयाच्या भावना कागदावर आनन्या ,शब्द माझे तयार होते !
पण ते तू वाचन्याआधीच ,अश्रुत माझ्या विरघळले होते !!3!!
होशील तू फ़क्त माझीच ,स्वप्न मला सांगत होते !
वास्तवात मात्र मन माझे ,एकटेच आगीत होरपळत होते !!४!!
येशील तू आयुष्यात माझ्या ,आशेवर जग माझे चालले होते !
कुणीतरी सांगेल तुला ,श्वास माझे तुझ्याचसाठी थांबले होते !!५!!


विश्वस्त :  Teaser मधे प्रकाशनाचे साहित्य टाकू नये अन्यथा लोकांना दिसणार नाही

Taxonomy upgrade extras: