... नाही आज पचत काही

(श्री. प्रदीप कुलकर्णी  ह्यांची  क्षमा मागून...)


 


काल जरा जास्तच हादडले... नाही आज पचत काही


पोट जरासे रुसून बसले... नाही आज पचत काही


 


ऊस लागला गोड तरी तो मुळापासुनी खाउ नये...


तेव्हा ना हे सत्य उमगले... नाही आज पचत काही


 


बोलुनचालुन कारकुन मी... चिरीमिरीची सवय मला


'फास्ट फूड' हे किंचित नडले...ंनाही आज पचत काही


 


'आपण भाऊ... मिळून खाऊ' होते अमुचे ब्रीद, अता


'ऐण्टीकरप्शन' उरी बैसले... नाही आज पचत काही


 


बकासुराच्या खादाडीचे व्हावे वारस, पण पोटी


हे भीमाचे बुक्के बसले... नाही आज पचत काही

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

सुरेशभट.इन ह्या संकेतस्थळावर विडंबनांना प्रोत्साह न देण्याचे धोरण आहे. आपली हझल स्वतंत्र रचना असायला हवी. कृपया हे लक्षात घेऊन सहकार्य करावे, ही विनंती.