आवे

जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे


माणसाची हाव वाढे
वेदनेचे चोर कावे


अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे


शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे


कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे


जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे   =   बापू दासरी

गझल: 

प्रतिसाद

शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे

कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे

हे फारच आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
वा...छान.

जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे
सुंदर...आवा या शब्दाचा छान वापर. ़ उत्तम कल्पना.
लहानपणी गावात कुंभाराचा आवा पेटलेला असताना पाहायला मजा यायची...विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत...उबदार वाटायचे. ठिणग्यांची भीतीही !
जुनी आठवण जागी केलीत, दासरीसाहेब. धन्यवाद.

कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे


जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे  
 
हे शेर आवडले.

अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे

जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे  

अतीशय सुरेख!

सहमत आहे. गझल आवडली. जुनी आठवण जागी केलीत.

शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावेकायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे

 .................हे  शेर छानच  आहेत 
गझल छान  जमली आहे 

अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावेकायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे.. वा वा
-मानस६

पापण्यांचे बंद आवे !!
चांगली कल्पना  !

प्रदीपरावांशी सहमत अगदी आहे. गझल आवडली बापू.

शे-यांनी चेतना दिली , आभार.  बापू

फार छान ...............
 
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे

शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे

 
 

बापूजी  गझल आवडली- विनोद

sahityatik bhashet sangata yenar nahi. pan gazal sarva samanyancha wastavte chi olakh watali.

बापू़़जी दमदार गझल-  विजय

मनाला भावणारी, अंत:क्करणाला भिडणारी  गझल , पुढेही अशाच रचना होवो ही कामना- रामदास होटकर, अलिबाग
 

आभार

खासच!- रसिका