मी तोच व्यास आहे ...


कोण जाणे का खडतर माझा प्रवास आहे..
हरेक पांथिकाला माझाचं त्रास आहे...

आधीच्याच जखमांनी जरी जीवन उदास आहे...
घालावी कुणी फ़ुंकर हि एक प्यास आहे...

दुख: दुनियेचे मिटवण्याचा माझा प्रयास आहे...
परी मजलाच दुख: मिळते हा दुर्दैवविलास आहे...

मृगजळी नात्यांनी बहकलो जरी कधी मी...
येईन पुन्हा पथावर हि एक आस आहे...

प्रत्येक धेय्य माझे मजसाठी खास आहे...
जिंकायचेच हे जग मज हाच ध्यास आहे...

दुनियेत या कलिच्या दुख: अनिवार ज्यास मिळते...
महाभारत रचिले ज्याने मि तोच व्यास आहे

रितेश भोईटे

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

गझलेचे नियम, व्याकरण आत्मसात करून तंत्रशुद्ध गझल लिहावी, ही विनंती. ही रचना तंत्रशुद्ध गझल नसल्याने विचाराधीन ह्या विभागात सावकाश हलविण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी.

--विश्वस्त