धरण

अपुलेच इथल्या माणसांनी पाहिले आहे मरण
बुडवुनी त्यांची घरे आता उभे येथे धरण

भारनियमनही अता पुष्कळ कमी झाले म्हणे
स्वतः जरी अंधारग्रस्त, वीज पुरवी हे धरण

संपन्नता येईल येथे, वर्षभर पिकतील शेते
सरकारच्या हेतूस ह्या का बरे हसते धरण?

पाणी दिले ना कालव्यांनी, करपली शेते उन्हाळी
फळ तयांच्या ह्या चुकीचे भोगते आहे धरण

अताशा वाढली आहे येथल्या नेत्यांची अक्कल
म्हणती, " फक्त नद्यांवर का? बांधुया समुद्रातही धरण!"

सांग आठवते तुला का भेट अंतिम आपुली
कळले न अपुल्या भावनांचे तेव्हा कसे फुटले धरण

संपला आतील साठा, आणखी नाही पुरवठा
मागते स्वतःच आता घोटभर जीवन धरण 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

प्रिय अमोल प्रभुदेसाई, रचना चांगली आहे. एकच यमक अनेकदा (२पेक्षा अधिक वेळा) वापरले आहे. त्यामुळे रचना विचाराधीन करण्यात येत आहे.
विश्वस्त