सुरकुत्या

भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही


मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"


बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही


किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!


उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही

गझल: 

प्रतिसाद

किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!


उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही
हे दोन्ही शेर आवडले.
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
छान...छान...
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
अप्रतिम, पुलस्ती !
शुभेच्छा.

किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
उत्तम! एकंदर गझलही आवडली. चिंतनशीलता हा तुमचा विशेष आहे. तो ह्या गझलेतही ठळक आहे.