घेउ तो श्याम आज सांगाती

तोडली रीत, सोडली नाती,
धार केली, चकाकली पाती
 
झाकती जात देवुनी नारे,
वीरगाथा खरीखुरी कीती?
 
माजला सांड, मालका मारी,
त्यास पाळा, ति कोणती नीती?
 
या धरा फेर, साथ द्या आता,
काळ आला! कुणास माहीती?
 
आळशी का कधी व्यथा जाणे?
लाथ घाला! मशाल घ्या हाती
 
मी पुढारी कशास होऊ सांगा!
घेउ तो श्याम आज सांगाती

-निलेश सकपाळ
 ०३ मार्च २००८

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

तोडली रीत, सोडली नाती,
धार केली, चकाकली पाती
 
आळशी का कधी व्यथा जाणे?
लाथ घाला! मशाल घ्या हाती
 
मी पुढारी कशास होऊ सांगा!
घेउ तो श्याम आज सांगाती

ह्या तीन द्विपदींत जशी अलामत पाळली आहे तशीच इतर द्विपदींतही पाळावे. कीती, माहीती, नीती चालणार नाही. दाती, साती, पाती, छाती अशी यमके मात्र चालतील.

अलामतीवर अधिक माहितीसाठी खालील दोन पाने वाचावीत-