कर्नाटकी सत्तासोस

कर्नाटकात निजद आणि भाजप यांचे संयुक्त सरकार अस्तित्त्वात होते.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे सुपुत्र कुमारस्वामी मुख्यमंत्री होते, तर भाजपचे येडीयुरप्पा हे उपमुख्यमंत्री होते.
वीस महिन्यानंतर येडीयुरप्पानी मुख्यमंत्री व्हायचे असा करार होता. पण कुमारस्वामींनी सत्ता हस्तांतरणाला नकार दिला.
भाजपने पाठिंबा काढून घेतला. परस्परविरोधी विचारांच्या या दोन पक्षांचे सत्तेसाठी एकत्र येणे सामान्य माणसाला रुचले नव्हते.
या परिस्थितीवरची माझी ही रचना बेळगाव तरुण भारतच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. खास आपल्यासाठी इथे पुन्हा देत आहे....

कर्नाटकी सत्तासोस

आरती करुन, देवे’ म्हणून, खूर्ची सोडतील वाटले होते
याचसाठी त्यांचे पाय वीस महिने चाटले होते

वीस महिन्यांच्या अटीवर, ‘कुमाराला’ ‘स्वामी’ केले
येडी’ पहात बसती वाट, राज्य त्यांनी लाटले होते

असंगाशी संग करुन, गळामिठी घातली होती
संगदिल’ गौडांनी, गळेच यांचे घोटले होते

लाचारी आणि लालसेचे उभे आडवे धागे होते
लाज जावी अशा जागी, सत्तावस्त्र फाटले होते

यांना सत्तेची हाव नडली, त्यांनी आपला शब्द मोडला
धर्मनिष्ठ’आणि धर्मनिरपेक्ष एकाच वेळी बाटले होते

-अविनाश ओगले

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

बेळ्गावातील मराठी बांधवांना आम्हा सर्वांचेच समर्थन आहे.पण उपरोक्त रचना  आशय चांगला  असूनही अत्यंत विस्कळीत आहे , असे खेदाने नमूद करावेसे वाटते.