उधार आहे....

माझ्याकडे जगाचे हसणे उधार आहे....
त्या कोवळ्या कळीचे फुलणे उधार आहे....

घायाळ वेदनांनी केले उरात घरटे..
आगीत त्यास तेथे नेणे उधार आहे....

कोणास ठाव कोठे जाईल जीव माझा..
थोडे अजून बाकी जगणे उधार आहे....

देहावरी फुलांचे फेकाल हार माझ्या
उपकार परत ते ही करणे उधार आहे....

हा जन्म घेतला मी तोट्यात काल येथे
त्याचेच व्याज मजला देणे उधार आहे....


[अलामत न पाळल्यामुळे गझल विचाराधीन करण्यात येत आहे--विश्वस्त]

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

पण नवे नाही. नव्या कल्पना आल्या तर आनंद होईल. पु.ले.शु.

विसूनानांशी सहमत.
काफियेही एकाच रीतीने आलेले नाहीत. उदा. 'फुलणे' नंतर 'नेणे'. दोन लघु असतील तर पुढेही दोन लघु चालवावेत.
शेरांचा अर्थही लगेच स्पष्ट होत नाही.

वृत्त मात्र चांगले अवगत आहे.
पुढील लेखनाला शुभेच्छा.
 

गझल कानाला बरी वाटली.
मनोजजी ॑ ब्यांकेत काम करतात काय ?

ई-जगतात स्वागत !

आपले अभिप्राय प्राप्त झालेत..
पहिल्याच गझलला अभिप्राय  मिळाल्याचा आनंद झाला....


प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

काफियांमधली  चूक मान्य......

माझी ,
 झालेल्या सर्व  चुका ( जुन्या कल्पना, अस्पष्ट अर्थबोध) सुधारावाव्यात अशी मनापासून इच्छा..
परंतु अधिक सविस्तर त्या चूका लक्षात आल्यास मानसिक समाधान लाभेल..

मा. कुलकर्णी साहेब...
"बँकेत तर नाही पण व्याजाचा धंदा आहे....!!
हवे असेल तर सांगा..??"
.
.
.
.
मी ही मस्करी केली राग मानू नका...

चु. भू. दे. घे.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद..