पहारा : डॉ. श्रीकृष्ण राऊत



तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बुऱ्याला लाव आग तू.


उगाच खोटी भीड कशाला ;
हक्क आपला तिला माग तू.


कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.


जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.


मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.


अजून नाही रात्र संपली ;
सक्त पहारा देत जाग तू. 


(प्रसिद्धी: 'कविता-रती' दिवाळी अंक २००६)


भेटा : http://www.mazigazalmarathi.blogspot.com  

प्रतिसाद

मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.
सुंदर आहे डॉक्टरसाहेब हा शेर. गझल खुप भावली.

आपली गझल आवडली.  त्यातही

मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.
वा!वा!
अजून नाही रात्र संपली ;
सक्त पहारा देत जाग तू.
वा!

हे २ शेर विशेष आवडले.

जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.

मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.

फारच छान...


 

कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.

तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बुऱ्याला लाव आग तू आणि
सत्याचा माग काढणे विशेष आवडले.
अजब

गझलगो
प्रियप्रज्ञा,चित्तरंजन भट,
प्रदीप कुलकर्णी,समीर चव्हाण,
आणि
अजब
आपण दिलेली दिलखुलास दाद
अधिक चांगलं लिहायला उर्जा देत राहील.
आपले मनःपूर्वक आभार
आणि
दिवाळीसह आपल्या गझललेखनास
हार्दिक शुभेच्छा.
- डॉ.श्रीकृष्ण राऊत