छंद, जाती, वृत्त आणि यतिविचार

छंद    अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. अर्थात, या पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिकपद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे. कोणत्याही नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणे छंद वा वृत्त म्हणतात, जसे पृथ्वी छंद, वैतालीय छंद, गीतिवृत्त इत्यादि. परंतु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यात आला आहे तसा छंद या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा.  
  
जाती    जातिरचनेत लगत्वभेद आहे. समरचनेतही अक्षरांची संख्या नि लगक्रम ही अभिन्न नसतात. तथापि लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची संख्या सारखी भरते. मात्रांची संख्या हे एकच काही या पद्यप्रकाराचे लक्षण नाही. या मात्रासंख्याकजातीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक वा पंचमात्रक आवर्तने असतात. या मात्रासंख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राछंद म्हणतात; परंतु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासंख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेले जाती हे नाव निश्चित करावे हे योग्य होय.

वृत्त    छंद आणि जाती यांव्यतिरिक्त हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. वृत्तात अक्षरांच्या संख्येचे बंधन असते इतकेच नव्हे त्यांचा लगक्रमही निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त म्हणावे.

यतिविचार    पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. हा यती ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या "जिह्वेष्टविश्रामस्थानाला"ही यती म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती, निदान पदसमाप्ती तरी व्हावी. तसे न झाल्यास जो कर्णकटू दोष होतो त्याला यतिभंग म्हणतात.
    यती मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असे दिसते.पिङ्गल आणि जयदेव हे यती मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे, तर यती हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निश्चित मानीत नसते एवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण 'यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषत:'असे परंपराप्राप्त वचन आहे.चरणान्ती यती हा निरपवादपणे असलाच पाहिजे. कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्या अनुरोधाने पडतात. 

लाविला गुलाबी रंग
किती सुंदर अमुच्या बंग-        ल्याप्रती!
मोगरी, चमेली, कुंद
लाविली चहुकडे सुंद        राकृती
गुंजतात गुंगं भृंग
तो तयांचा गुंग        वी मतीयासारखी हास्योत्पादक पद्ये सोडली तर चरणान्ती शब्दसमाप्ती न होण्याचा प्रश्नच संभवत नाही. परंतु 
प्रभूते म्हणे, हे पहा आंग,लीला-
वती मी, वरावे मला चांगलीलाहे हास्योत्पादक नाही, हास्यास्पद आहे.गझलचर्चा: