चाललेला !
मी  माणसे मनाला जडवीत चाललेला
की  सावल्याच खोट्या कवळीत चाललेला ?


सोप्याच चेहर्‍याने आला कधी  न कोणी
चेहर्‍यांचे उखाणे उकलीत चाललेला


दु:खात सोबतीला धावून तेच आले
नात्यास आसवांच्या मिरवीत चाललेला


चंद्रास पाहिला मी  मंदावल्या पहाटे
चांदण्यांचा पसारा उचलीत चाललेला


आठवेना अता हे होतो खरा कसा मी
मुखवटे हे कुणाचे चढवीत चाललेला


पाहिले पुसू ज्यांनी काल अस्तित्व माझे
जगणे तयांस माझे पटवीत चाललेला


प्रत्येक पावलाला आभास हे कुणाचे
आसावल्या मनाला अडवीत चाललेला


झाकून वेदनांना हसतो कसानुसा मी
माझे मला, जगाला फसवीत चाललेला


मी  एकटाच येथे कां साकळून आहे ?
काळ एकेक साथी वेचीत चाललेला


 


 


 


 


 


 


 
Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

विशेषतः चंद्र, उखाणे आणि काळ या शेरातला वेगळेपणा जाणवला!
वृत्त सांभाळलं तर तुमच्या कल्पनाना आणि विचाराना योग्य न्याय मिळेल. तसेच, "मी चाललेला" असा प्रयोग जरा खटकतो..
चू.भू.द्या.घ्या. पु. ले. शु. !!
-- पुलस्ति.

श्रावण,
पुलस्तिंशी १००% सहमत.. कल्पना चांगल्या आहेत; पण 'चाललेला' ही रदीफ सांभाळताना जरा ओढाताण झाली आहे असं वाटतं.
- कुमार