जीवन

गरज माझी असता लागले टाळायला मला
त्यांची वेळ आली तर आले कवटाळायला मला  ।

मी सोशिले चटके  दु:खभरल्या क्षणांचे
मग आला वैशाखवणवा जाळायला मला ।

हात कुणाचे मिळावे म्हणून पाय कुणाचे ओढले
रीत जगाची लागली पाळायला मला ।

काल या इथेच ज्यांनी दगड होते मारले
आज आले गजरे माळायला मला ।

कामना केली ज्याची ते सारे मिळाले
माझ्या नशिबावर झाले भाळायला मला ।

चटक लागली  मला सत्तेची आणि संपत्तीची
घाम नव्हे रक्त लागले गाळायला मला ।

पश्चात्तापाच्या अश्रुंनी मी पुरता भिजलो
जन्म एक अपुरा पडेल वाळायळा मला  ।

जीवनाच्या शर्यतीत मी  एकटाच उरलो
मॄत्यु  आला धावुन कुरवाळायळा मला ।

नाव माझे आले वॄत्तपत्राच्या कोपर्‍यात
खबर म्हणून लगले चाळायला मला ।

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

जीवनाच्या शर्यतीत मी  एकटाच उरलो
मॄत्यु  आला धावुन कुरवाळायळा मला ।
 

नसली तरी रदीफ आणि काफियाचा चांगलाच अंदाज तुम्हाला आला आहे असे दिसते. कल्पनाही चांगल्याआहेत.ह्या गझलेत ´मला´ ह्या रदीफासोबत ´माळायला',  'जाळायला' अशी यमके, काफिये आपण नीट योजिली आहेत.

 आता राहाते एकचगोष्ट. ती म्हणजे वृत्त. ह्या रचनेसाठी योग्य असे वृत्त बघायला हवे. आणि प्रत्येक ओळ त्याच वृत्तात असायला हवी.