माहीत नाही...

फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...

शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...

चालणारी मी सरळ नाकापुढे या...
शब्दही मज 'वाकडा' माहीत नाही...

अर्थ जातो आसमंताहून वरती...
भाव साधा, तोकडा माहीत नाही...

घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...

कु. जिज्ञासा भावे...

गझल: 

प्रतिसाद

बरीच दिवस लागलीत प्रकाशीत व्हायला...
मी बेचैन झाले होते...
.
.
जाउदेत...
प्रकाशीत करण्याबद्दल अतिशय धन्यवाद...

घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...

सुंदर द्विपदी आहे जिज्ञासा .... वाह !!!

संकेतस्थळावर स्वागत.
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...

छान. सुट्या-सुट्या ओळी आवडल्या.

वा वा.चांगली गझल जिज्ञासा.

बरेच सुटे मिसरे आवडले.

शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...हा शेर आवडला.

शुभेच्छा.

छान गझल !
सुरेख , आवड्ली .
शुभेच्छा !

फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...

शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...

हे दोन खूप आवडले :)

विद्यानंद जी,
चित्तरंजन जी,
कैलास जी,
विरेंद्र जी,
प्रसाद जी....
तुम्हा सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद...

वा वा.
अनेक कल्पना/शेर आवडले.

संस्थळावर स्वागत. पुढील लिखाणास शुभेच्छा.

घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...

क्या बात है..........

शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
शिंपला कोणी सडा माहीत नाही... ( असंही वाचून बघितलं)

जिज्ञासा ,
छान!
स्वागत इथे!

अर्थ जातो आसमंताहून वरती...
भाव साधा, तोकडा माहीत नाही..

अर्थ आणि भाव ...जागा बदलून पाहिल्या तर वेगळा अर्थ पोचेल का?

विचारात!

योगेश वैद्य

सगळीच सुंदर!!
घाम इतका गाळला शेतात माझ्या..
की जमीनीला तडा माहीत नाही...
खूप आवडला!

घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही

खूप सुंदर!

ज्ञानेश जी...
मयुरेश जी...
योगेश. जी...
शाम जी...
बेफिकीर जी...
तुम्हा सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद..