माहीत नाही...
फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...
चालणारी मी सरळ नाकापुढे या...
शब्दही मज 'वाकडा' माहीत नाही...
अर्थ जातो आसमंताहून वरती...
भाव साधा, तोकडा माहीत नाही...
घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...
कु. जिज्ञासा भावे...
गझल:
प्रतिसाद
जिज्ञासा...
बुध, 01/06/2011 - 01:06
Permalink
बरीच दिवस लागलीत प्रकाशीत
बरीच दिवस लागलीत प्रकाशीत व्हायला...
मी बेचैन झाले होते...
.
.
जाउदेत...
प्रकाशीत करण्याबद्दल अतिशय धन्यवाद...
विद्यानंद हाडके
बुध, 01/06/2011 - 07:35
Permalink
घाम इतका गाळला शेतात
घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...
सुंदर द्विपदी आहे जिज्ञासा .... वाह !!!
चित्तरंजन भट
बुध, 01/06/2011 - 12:16
Permalink
संकेतस्थळावर स्वागत. शांत
संकेतस्थळावर स्वागत.
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...
छान. सुट्या-सुट्या ओळी आवडल्या.
कैलास
गुरु, 02/06/2011 - 17:17
Permalink
वा वा.चांगली गझल
वा वा.चांगली गझल जिज्ञासा.
बरेच सुटे मिसरे आवडले.
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...हा शेर आवडला.
शुभेच्छा.
वीरेद्र बेड्से
मंगळ, 07/06/2011 - 21:14
Permalink
छान गझल !
छान गझल !
सुरेख , आवड्ली .
शुभेच्छा !
प्रसाद लिमये
मंगळ, 07/06/2011 - 22:02
Permalink
फोडला कोणी घडा माहीत
फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
टाकला कोणी सडा माहीत नाही...
हे दोन खूप आवडले :)
जिज्ञासा...
मंगळ, 21/06/2011 - 01:19
Permalink
विद्यानंद जी, चित्तरंजन
विद्यानंद जी,
चित्तरंजन जी,
कैलास जी,
विरेंद्र जी,
प्रसाद जी....
तुम्हा सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद...
ज्ञानेश.
मंगळ, 21/06/2011 - 16:09
Permalink
वा वा. अनेक कल्पना/शेर
वा वा.
अनेक कल्पना/शेर आवडले.
संस्थळावर स्वागत. पुढील लिखाणास शुभेच्छा.
मयुरेश साने
मंगळ, 21/06/2011 - 21:34
Permalink
घाम इतका गाळला शेतात
घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही...
क्या बात है..........
शांत पृथ्वीची कुणी ही आग केली...
शिंपला कोणी सडा माहीत नाही... ( असंही वाचून बघितलं)
योगेश वैद्य
बुध, 22/06/2011 - 12:51
Permalink
जिज्ञासा , छान! स्वागत
जिज्ञासा ,
छान!
स्वागत इथे!
अर्थ जातो आसमंताहून वरती...
भाव साधा, तोकडा माहीत नाही..
अर्थ आणि भाव ...जागा बदलून पाहिल्या तर वेगळा अर्थ पोचेल का?
विचारात!
योगेश वैद्य
शाम
शुक्र, 24/06/2011 - 17:49
Permalink
सगळीच सुंदर!! घाम इतका गाळला
सगळीच सुंदर!!
घाम इतका गाळला शेतात माझ्या..
की जमीनीला तडा माहीत नाही...
खूप आवडला!
बेफिकीर
शुक्र, 01/07/2011 - 00:29
Permalink
घाम इतका गाळला शेतात
घाम इतका गाळला शेतात माझ्या...
की जमीनीला तडा माहीत नाही
खूप सुंदर!
जिज्ञासा...
मंगळ, 06/09/2011 - 17:04
Permalink
ज्ञानेश जी... मयुरेश
ज्ञानेश जी...
मयुरेश जी...
योगेश. जी...
शाम जी...
बेफिकीर जी...
तुम्हा सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद..