आसवे.....
आसवे.....
.
पापण्यांना भार झाली आसवे,
जाणतीशी....! मौन पाळी आसवे !!
काळ-वेळेची नसे यांना क्षिती,
हुंदका जाळून आली आसवे !
काळजाला काळजीचे साकडे,
काजळा वाहून काळी आसवे !
भूलथापांना अशी गेले बळी,
गोंदली तेव्हाच भाळी आसवे !
साथ देते का कुणी जन्मांतरी,
सौख्य-दु:खा फ़क्त साक्षी आसवे !
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल: