वेड तो लावून गेला (गझल)
वेड तो लावून गेला (गझल)
रात राणी चांद मागे वेड तो लावून गेला
आज सारी रात जागी तो मला भावून गेला
आठवांच्या मैफिलीने सांज होती रंगलेली
भैरवीचे सूर सारे आज तो गावून गेला
काळजाला आस लागे भावना ती पेटलेली
मोग-र्याचे भास सारे ध्यास तो दावून गेला
गूढ काळ्या सावलीने स्वप्न सारी झाकलेली
काजव्याच्या स्वागताला खास तो धावून गेला
वेदनेचे डंख सारे मी मुक्याने सोसलेले
कोरड्या डोळ्यास माझ्या तोच ओलावून गेला
मनिषा नाईक .........(माऊ)
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
शनि, 20/11/2010 - 20:18
Permalink
छान........ गूढ काळ्या
छान........
गूढ काळ्या सावलीने स्वप्न सारी झाकलेली
काजव्याच्या स्वागताला खास तो धावून गेला
बहर
सोम, 22/11/2010 - 01:03
Permalink
ठीक.
ठीक.
आनंदयात्री
बुध, 24/11/2010 - 14:32
Permalink
शेवटचाच आवडला..
शेवटचाच आवडला..
सुरेश शिरोडकर
गुरु, 02/12/2010 - 19:01
Permalink
वेदनेचे डंख सारे मी मुक्याने
वेदनेचे डंख सारे मी मुक्याने सोसलेले
कोरड्या डोळ्यास माझ्या तोच ओलावून गेला
हा शेर जास्त आवडला.