सांत्वन...( गझल )

काल माझ्या सांत्वनाला कोण तो येवून गेला
एक माझा हुंदका रे.. एक तो देवून गेला !!

हा कुणाचा हात आणी ही कुणाची आसवे रे
हाक मारू मी कशी..आवाज ही घेवून गेला !!

का घरे वाहून गेली कालच्या त्या पावसाने
का नदीचा काठ माझा कोरडा ठेवून गेला !!

पांगळी माझी व्यथा का आंधळ्या गावास सांगू?
मी न केली आर्जवे तो का पुन्हा येवून गेला !!

सावळी माझी कहाणी,सावळा माझा मुरारी
सावळेसे सूर माझे सावळा घेवून गेला !!

ममता..